ग्रुपग्रामपंचायत चाणजे यांच्यावतीने पाणी ए.टी. एमचे व अंतर्गत गटारलाईनचे उदघाटन.


उरण दि 8(विठ्ठल ममताबादे )चाणजे ग्रुपग्रामपंचायतचे सरपंच अमिताभ भगत यांच्या विशेष प्रयत्नाने ओ.एन.जी.सी कंपनीकडून सी.एस.आर फंडातून मंजूर करून सदर पिण्याच्या पाण्याचे ए.टी.एम. कोंढरीपाडा येथे बसवण्यात आला.या एटीएमचे उदघाटन सरपंच अमिताभ भगत व अरविंद घरत यांनी केले.सदर ए.टी.एमचा सन २०१८ पासून माजी सरपंच हिना कोळी यांच्या कालावधीत पाठपुरावा केला होता. 


 तरी या कामासाठी ओ.एन.जी.सी.कर्मचारी सामाजिक कार्यकर्ते अरविंद घरत यांनी सहकार्य केले .तसेच यावेळी वाॅर्ड क्रमांक सहामधील कोंढरी गावातील सुरेंद्र भोईर ते समुद्रापर्यंत अंतर्गत गटारलाईनचे उदघाटन करण्यात आले.या कामाचे उदघाटन सदस्य व्यंकटेश म्हात्रे व सदस्या सुप्रिया कोळी यांनी केले.या प्रसंगी सरपंच अमिताभ भगत, अरविंद घरत,ग्रामपंचायत सदस्य व्यंकटेश म्हात्रे,सुप्रिया कोळी, राजू पाटील, विश्वनाथ पाटील, करण भोईर, दत्ताराम भोईर, तेजस पाटील,भानुदास पाटील, कल्पेश भोईर,हर्षा म्हात्रे,सुलोचना म्हात्रे,वंदना भोईर तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ व महिलावर्ग उपस्थित होत्या.


थोडे नवीन जरा जुने