पनवेल मधील उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते डॉ. संजय सोनावणे यांनी दिलेल्या शब्दांप्रमाणे आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या खेळाडूना दिले रोख रक्कमेचे पारितोषिक




पनवेल दि. २३. ( संजय कदम ) : पनवेल मधील उद्योजक व लोकशक्ती संजीवनी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय सोनावणे यांनी दिलेल्या शब्दांप्रमाणे आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या खेळाडूना रोख रक्कमेचे पारितोषिक जाहीर केले होते व प्रत्यक्ष कार्यक्रमांत खेळाडू व त्यांच्या कुटुंबियांकडे सुपूर्त केले.



                      सौ.सुनीतादेवी सोनावणे ज्ञानगंगा हायस्कूल कोल्हापूर वार्षिक स्नेहसंमेलन पारितोषिक वितरण सोहळ्यासाठी विद्यालयात आलेले प्रमुख पाहुणे आंतरराष्ट्रीय स्तरावरचे खेळाडू सार्थक शेलार व आदित्य पाटील यांना प्रेरणा पुरस्कार म्हणून डाॅ. संजय सोनावणे परिवाराने जाहीर केलेल्या प्रत्येकी 11000 रु. बक्षिसाचे धनादेश आज कोल्हापूर दौऱ्यात डाॅ.संजय सोनावणे परिवाराने समक्ष खेळाडू व त्यांच्या कुटुंबियांकडे सुपूर्त केले. 




यावेळी सौ.सुनितादेवी सोनावणे ज्ञानगंगा हायस्कूल कोल्हापूर चे अध्यक्ष जी एस पाटील (बापू ) एस.आर.एस ग्रुप च्या सौ.सुनीतादेवी सोनावणे, कु.संस्कृती सोनावणे, स्वराज सोनावणे, मुख्याध्यापक धनाजी बेलेकर , महेश पाटील, दत्तात्रय कोळेकर , गजानन काटकर सतीश माळवी व नितीन विभुते इ.मान्यवर उपस्थित होते. 




थोडे नवीन जरा जुने