वेश्वी ग्रामपंचयतच्या सरपंचच्या तीन अपत्याच्या कारवाईबाबत दिरंगाई होत असल्याच्या निषेधार्थ गोपाळ पाटील करणार आमरण उपोषण


उरण दि 23 (विठ्ठल ममताबादे ) रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील वेश्वि ग्रामपंचायतचे सरपंच संदिप कातकरी यांना तीन अपत्ये असल्याचा अहवाल गटविकास अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे. तसेच विद्यमान सरपंच संदिप कातकरी यांच्या विरोधात सर्व सबळ पुरावे असताना वेश्वीचे सरपंच संदिप कातकरी यांच्यावर प्रशासनातर्फे कोणतेही कायदेशीर कारवाई होत नसल्याच्या निषेधार्थ वेश्वी येथील सामाजिक कार्यकर्ते गोपाळ पाटील हे दिनांक 1 मे 2023 रोजी 11 वाजल्यापासून जिल्हाधिकारी कार्यालय अलिबाग समोर आमरण उपोषण करणार आहेत


.गोपाळ पाटील यांनी गृहमंत्री,जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, कोकण आयुक्त बेलापूर, पालकमंत्री रायगड, पोलीस अधिक्षक रायगड आदि ठिकाणी पत्रव्यवहार करून बेकायदेशीर रित्या सरपंच पदावर असलेल्या संदिप कातकरी यांचे सरपंच पद रद्द करावे व त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी पत्रव्यवहारातून प्रशासनाकडे केली आहे.महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम (१९५९चा मुंबई अधिनियम क्रमांक ३) १४ ज (१)नुसार दोन पेक्षा अधिक अपत्ये असल्यास त्या व्यक्तीचे ग्रामपंचायत सदस्त्व आणि सरपंच पद रद्द होते.या कलमानुसार 2 पेक्षा अधिक मुलं असलेल्या व्यक्तीला सरपंच, उपसरपंच, सदस्य पदावर राहता येत नाही.  फेब्रुवारी 2021 पासून वेश्वि ग्रामपंचायतच्या सरपंच पदावर संदिप कातकरी कार्यरत आहेत.26/9/2022 रोजी त्यांना तिसरे अपत्य झाले आहे.वेश्विचे सरपंच संदिप कातकरी यांना तीन अपत्ये असूनही शासन त्यांच्यावर कोणतेही कारवाई करीत नाही.पत्रव्यवहार करून सुद्धा शासनाचे चाल ढकलपणा सुरूच आहे.त्यामुळे दिनांक 1 मे 2023 रोजी सकाळी 11 वाजल्यापासून जिल्हाधिकारी कार्यालय अलिबाग समोर आमरण उपोषण करणार असल्याचे सामाजिक कार्यकर्त गोपाळ पाटील यांनी सांगितले.


थोडे नवीन जरा जुने