रायगड जिल्हयातील प्रकल्पाला मिळाला पर्यावरण उत्कृष्टतेसाठी ग्रीन लीफ प्लॅटिनम पुरस्कार


·

    

 पनवेल(प्रतिनिधी) अ‍ॅपेक्स इंडिया फाऊंडेशनतर्फे रायगड जिल्ह्यातील सावरोली येथील टाटा स्टीलच्या प्लांटला २०२२ मधील पर्यावरण उत्कृष्टतेसाठी ग्रीन लीफ प्लॅटिनम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा प्रतिष्ठेचा पुरस्कार म्हणजे प्रकल्पाच्या शाश्वतता आणि पर्यावरणीय कामगिरीविषयीच्या अनुकरणीय बांधिलकीला मिळालेली मान्यता आहे.




           हा पुरस्कार समारंभ गोव्यातील सुरक्षा, आरोग्य, पर्यावरण आणि एक्स्पो वरील अ‍ॅपेक्स इंडिया परिषदेदरम्यान झाला. यावेळी खोपोली प्लांटला भारताचे प्रसिद्ध संरक्षण तज्ज्ञ निवृत्त मेजर जनरल पी के सैघल आणि प्रसिद्ध अभिनेत्री आणि सामाजिक कार्यकर्त्या पूनम धिल्लन यांच्या हस्ते आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.



       पर्यावरणीय प्रभाव कमी करून नाविन्यपूर्ण आणि शाश्वत पद्धती लागू करत अतुलनीय कामगिरीचे प्रदर्शन करणाऱ्या व्यवसायांनाग्रीन लीफ प्लॅटिनम पुरस्कार बहाल केला जातो. मागील आर्थिक वर्षात खोपोली प्लांटने शाश्वततेवर अनेक उपक्रम राबविले परिणामी पाण्याचा वापर, कचरा निर्मिती आणि उत्सर्जन कमी झाले. हे इंधन बदल, झिरो एफ्लुएंट डिस्चार्ज साध्य करणे आणि रेन वॉटर हार्वेस्टीग प्रणाली स्थापित करणे यासह इतर अनेक उपक्रमांद्वारे साध्य केले गेले. 



या मान्यतेमुळे उत्सर्जन कमी करण्यासाठी, संसाधनांचे संरक्षण करण्यासाठी आणि उद्योग क्षेत्रामध्ये शाश्वत विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी युनिटच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांवर प्रकाश टाकण्यात येतो. अ‍ॅपेक्स इंडिया फाऊंडेशन ही भारतातील पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासावर लक्ष केंद्रित करणारी आघाडीची ना-नफा मान्यवर संस्था असून ग्रीन लीफ प्लॅटिनम हा अत्यंत मानाचा पुरस्कार म्हणून गणला जातो. 







थोडे नवीन जरा जुने