सीकेटी महाविद्यालयात मंगळवारी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० संभावना आणि आव्हाने या विषयावर परिसंवादाचे आयोजन
सीकेटी महाविद्यालयात मंगळवारी “राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०: संभावना आणि आव्हाने” या विषयावर परिसंवादाचे आयोजनपनवेल(प्रतिनिधी) जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनी येथील चांगु काना ठाकूर महाविद्यालयात (स्वायत्त) मंगळवार दिनांक १८ एप्रिल २०२३ रोजी दुपारी ०३ वाजता अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व एम.के.सी.एल शाहू इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी प्रा. लि. यांच्या समन्वयाने “राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०: संभावना आणि आव्हाने” या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.
        या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर हे असणार आहेत तर प्रमुख पाहुणे म्हणून एम. के. सी.एल. चे मुख्य मार्गदर्शक आणि माजी व्यवस्थापकीय संचालक विवेक सावंत यांची उपस्थिती लाभणार आहे. तसेच या कार्यक्रमासाठी सन्माननीय अतिथी म्हणून संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य आमदार प्रशांत ठाकूर, संस्थेचे सचिव मा. डॉ. एस. टी. गडदे, प्राचार्य प्रो. डॉ. एस. के. पाटील, तसेच आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स विद्याशाखांचे प्रमुख आणि विविध विभागांचे प्रमुख उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमामध्ये रायगड जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांच्या प्रतिनिधींचा सहभाग असणार आहे. यावेळी विवेक सावंत हे “राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०: संभावना आणि आव्हाने” या विषयावर सर्व उपस्थितांना विशेष मार्गदर्शन करणार आहेत.
थोडे नवीन जरा जुने