तीन वाहनांचे विचित्र अपघात; सुदैवाने जीवितहानी नाही
तीन वाहनांचे विचित्र अपघात; सुदैवाने जीवितहानी नाही
पनवेल दि.१४ (वार्ताहर) : पनवेल जवळील खांदेश्वर पोलीस ठाणे हद्दीत मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे रोडवर मुंबई लेनवर पहाटेच्या सुमारास तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली मात्र वाहनांचे नुकसान झाले आहे.                     मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर अशोक लेलँड टेम्पोचालक प्रकाश सुर्वे (रा.पुणे ) हे त्यांच्या ताब्यातील टेम्पो (एमएच १४ केक्यू ९६४८) घेऊन मुंबई बाजूकडे शोल्डर लेन वरून चालवत घेऊन जात होते. मात्र अचानक उजवीकडे गाडीचे वळण घेतल्याने पाठीमागून आलेल्या टाटा टेम्पो (एमएच 14 इएम ६७७२) वरील चालक पिरअली अहमद कुरेशी (रा.उत्तर प्रदेश) ने जोरात धडक दिली. या अपघातात टाटा टेम्पोचे स्टेरिंग रोड तुटल्याने टेम्पो जागीच उभा असताना त्याच दरम्यान त्याच्या पाठीमागून अशोक लेलँड ट्रक (एमएच १२ एमव्ही 7716) वरील चालक तानाजी जामकर (रा.सोलापूर) यांनी उभा असलेल्या टेम्पोला पाठीमागून धडक दिली. या अपघातात सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही मात्र वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सदर घटनेची माहिती मिळताच पळस्पे मोबाईल स्टॉप व आयआरबी स्टाफ यांनी घटनास्थळी दाखल होत अपघातग्रस्त वाहने सुरक्षितरित्या रस्त्याच्या बाजूला केली.


थोडे नवीन जरा जुने