पनवेल परिसरात दोन वेगवेगळ्या अपघातात एक जखमी







पनवेल परिसरात दोन वेगवेगळ्या अपघातात एक जखमी 
पनवेल दि.१४ (वार्ताहर) : पनवेल परिसरातील कळंबोली सर्कल आणि तळोजे येथे झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात एक जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. 



                पनवेलमध्ये राहणारे मनोज मंडल आपली कार घेऊन मुंबई-पुणे महामार्गावरून प्रवास करत असताना कळंबोली सर्कलजवळ एका टैंकरने त्यांच्या कारला धडक दिली. या अपघातामध्ये सुदैवाने कोणी जखमी झाले नाही. परंतु, कारचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी टैंकर



 चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसऱ्या घटनेत तळोजा सेक्टर ११ येथे शिवाणी शिंदे या आपला किराणा दुकान बंद घरून घरी जात असताना एका कारने (एमएच ०३ बीएम ४९८०) त्यांच्या स्कूटीला धडक दिली. यामध्ये शिवाणी या जखमी झाल्या असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. या प्रकरणी कार चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे

.
थोडे नवीन जरा जुने