पनवेल(प्रतिनिधी) भाजपचे पुणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि ज्येष्ठ नेते गिरीश बापट यांचे आज (बुधवार दि.२९ मार्च) सकाळी पुण्यात निधन झाले. वयाच्या ७२ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली.
माजी मंत्री आणि भाजपचे खासदार गिरीश बापट यांचे निधन झाल्याचे वृत्त वेदनादायी आहे. रायगड जिल्हा भाजपच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. गिरीश बापट यांच्या जाण्याने मोठी हानी झाली आहे. पुण्यात आपल्या कार्यामुळे त्यांनी भाजप रुजवली आणि वाढवली. त्याचबरोबर महाराष्ट्रात भाजप वाढवण्यात त्यांचा मोठा हातभार होता. त्यांच्या जाण्याने भाजपची अपरिमित हानी झाली आहे. वेगवेगळ्या बैठकांमधुन त्यांच्याशी भेट झाली आणि त्यांचा साधेपणा प्रेरणा देणारा होता. भाजपच्या कार्यकर्त्यांनी कसे काम करावे हे त्यांच्या कृतीतून नेहमी दिसून आले, अशा शब्दात भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष तथा पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी गिरीश बापट यांना श्रद्धांजली वाहिली.
Tags
पनवेल