सारडे ग्रामविकास कमिटीच्या अध्यक्षपदी मनोज पाटील यांची एकमताने निवड.उरण दि १७(विठ्ठल ममताबादे )दिनांक १६ एप्रिल रोजी संध्याकाळी ७.०० वाजता श्री राधाकृष्ण मंदिर सारडे येथे सारडे ग्रामविकास कमिटीची विस्तारित सभा पार पडली.या सभेमध्ये एकमताने मनोज कृष्णा पाटील यांची सारडे ग्रामविकास कमिटीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. तर उपाध्यक्ष पदी संदीप धनाजी पाटील यांची निवड करण्यात आली.सेक्रेटरी पदी विशाल हरीशचंद्र म्हात्रे, खजिनदार पदी प्रितम घनश्याम म्हात्रे,प्रसिद्धीप्रमुख पदी आदेश सुनिल पाटील यांची निवड करण्यात आली.सह सेक्रेटरी म्हणून चंद्रशेखर छगन पाटील,सह खजिनदार पदी शक्ती विलास वर्तक,भूषण श्रीधर म्हात्रे,सागर परशुराम पाटील तर सह प्रसिद्धी प्रमुख पदी राज नारायण पाटील यांची निवड करण्यात आली.
कमेटी च्या सल्लागार पदी ऍड. हिरामण पाटील व शांताराम म्हात्रे यांची निवड झाली.कमेटीवर सदस्य म्हणून सारडे ग्रामपंचायत सरपंच रोशन पाटील,ग्रामपंचायत सदस्य अमित म्हात्रे,भार्गव म्हात्रे,समाधान पाटील,उत्तम म्हात्रे,धंनजय माळी,महेश पाटील यांची सारडे ग्रामस्थांमधून उस्फूर्तपणे नावे आली.
                       गावठाणविस्तार साठी लोकवर्गणी गोळा करून सीमांकणासाठी प्रस्ताव सादर करण्यात येणार असून जनजागृती साठी कमेटी गुरुवार, ते शनिवार या दिवशी ग्रामस्थांच्या भेटी गाठी घेणार आहे असे सारडे ग्रामविकास कमिटीचे नवनिर्वाचित अध्यक्ष मनोज पाटील यांनी माहिती दिली

.
थोडे नवीन जरा जुने