श्री सदस्यांवर हेलिकॉप्टरमधून पुष्यष्टी









श्री सदस्यांवर हेलिकॉप्टरमधून पुष्यष्टी

आज नवी मुंबई, खारघर येथे जेष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. त्यानिमित्त लाखो श्री सदस्य जमले असून त्यात अजून वाढ होत आहे. सध्या उन्हाचा तडाखा वाढला असला तर उत्साह मात्र कमी झालेला नाही. छोट्या शहरातून आलेल्या श्री सदस्यांनी उन्हाचा तडाखा ओळखत सोबत छत्र्या आठवणीने आणल्या आहेत. उन्हात बसलेल्या श्री सदस्यांच्या उन्हापासून सोबतच्या छत्रीचा आधार आहे.. तर अनेकांनी या मैदानातील एकमेव झाडाच्या सावलीचा आधार घेतला आहे.



मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हेलिकॉपर मधून पुष्पवृष्टी करत असल्याची माहिती समालोचकांनी देताच आनंदाचे उधाण आले होते. महाराष्ट्र भूषण सोहळ्यानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून पुरस्कार सोहळ्यासाठी उपस्थित असलेल्या लाखो श्री सदस्यांवर हेलिकॉप्टर मधून पुष्वृष्टी करण्यात आली.


थोडे नवीन जरा जुने