पोलिसाच्या पत्नीचीच चेन खेचली






कामोठे येथे चैन स्नॅचींग करणाऱ्या लुटारुंनी पोलीस पत्नी असलेल्या शिक्षिकेच्या गळ्यातील तब्बल १ लाख ६० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने लुटून नेल्याची घटना कामोठे सेक्टर ३६ मध्ये घडली. कामोठे पोलिसांनी या प्ररकरणी दोघा अज्ञात लुटारु विरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करुन त्यांचा शोध सुरु केला आहे.

या घटनेतील तक्रारदार या कामोठे सेक्टर- ३५ मध्ये राहण्यास असून त्या मुंबईत बीएमसीच्या शाळेत शिक्षिका आहेत. तर त्यांचे पती हे मुंबई पोलीस दलात हवालदार म्हणून कार्यरत आहेत. या शिक्षिका रोज सकाळी आपल्या पतीसह मॉर्निंग वॉकसाठी जात असतात. त्या आपल्या पतीसह नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी गेल्या होत्या. सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास त्या सेक्टर ३६ मधील भुमी टॉवर इमारतीजवळ आल्या असताना समोरुन एक स्कुल बस आल्याने त्या बाजुला उभ्या राहिल्या.



 याचवेळी त्यांच्या समोरुन विरुद्ध दिशेने मोटारसायकलवरून आलेल्या दोघा लुटारुंपैकी पाठीमागे बसलेल्या लुटारूने या शिक्षिकेच्या गळ्यावर जोरात हात मारून त्यांच्या गळ्यातील ६० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मंगळसूत्र व १ लाख रुपये कितमीची सोन्याची चैन खेचुन शिवसेना चौकाच्या दिशेने पळून गेले. यावेळी शिक्षिकेने आरडा-ओरड केली. मात्र तोपर्यंत सदर लुटारु पसार झाले. त्यामुळे या शिक्षिकेने पतीसह कामोठे पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.


थोडे नवीन जरा जुने