महाराष्ट्र भूषण कार्यक्रमानंतर काही श्री सदस्यांचा उष्माघाताने मृत्यूमहाराष्ट्र भूषण कार्यक्रमानंतर काही श्री सदस्यांचा उष्माघाताने मृत्यू
शिवसैनिक मदतीसाठी तत्पर.
 महानगर प्रमुख प्रथमेश सोमण यांनी दिली माहिती.
पनवेल मधील खारघर येथे आज सकाळी महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान सोहळा पार पडला. आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे लाखो अनुयायी या कार्यक्रमाचा साक्षीदार होण्यासाठी उपस्थित होते परंतु उन्हाळ्याचे दिवस असून पारा 40 च्या वर गेल्याने त्यातील आठ ते दहा श्री सदस्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून 20 ते 25 श्री सदस्य उपचार घेत आहेत व त्यांची प्रकृती स्थिर आहे.
 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एमजीएम कळंबोली रुग्णालयाला भेट देऊन मृतांसाठी आर्थिक मदत जाहीर केली तर उपचारांचा सर्व खर्च शासनातर्फे करण्यात येईल असे जाहीर केले मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर महानगर संघटक मंगेश रानावडे, उपमहानगर प्रमुख रोशन पवार, खारघर शहरप्रमुख प्रसाद परब, हे टाटा हॉस्पिटल येथे उपचार घेत असलेल्या रुग्णांची चौकशी करण्याकरता पोहोचले. तर पनवेल शहर संघटक अभिजीत साखरे, उपशहर प्रमुख अर्जुन परदेशी, मच्छिंद्र झगडे, शाखाप्रमुख रमेश बैद, तोफिक बागवान इत्यादी पदाधिकारी ही कळंबोली एमजीएम व पनवेल येथील उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांसाठी आवश्यक ते सहकार्य करण्यासाठी धावपळ करत आहेत. उपजिल्हा रुग्णालय येथे मृत श्री सदस्यांच्या शवविच्छेदनाचे काम सुरू आहे. कळंबोली, खारघर, पनवेल विभागातील सर्व शिवसेनेचे पदाधिकारी आवश्यक तिथे हॉस्पिटलला भेटी देत असून रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना सर्वतोपरी सहकार्य करत आहेत व सर्व पदाधिकाऱ्यांशी आमची वारंवार चर्चा होत असून पक्षातर्फे आवश्यक ते सर्व सहकार्य पोहोचवण्याचं काम सुरू असल्याबाबतची माहिती महानगरप्रमुख प्रथमेश चंद्रशेखर सोमण यांनी दिली.


थोडे नवीन जरा जुने