अनैतिक संबधातुन प्रेयसीने प्रियकराच्या सहाय्याने केली पतीची हत्या; मानपाडा पोलिसांनी ३ तासात केली अटक

अनैतिक संबधातुन प्रेयसीने प्रियकराच्या सहाय्याने केली पतीची हत्या; मानपाडा पोलिसांनी ३ तासात केली अटक
पनवेल दि.२४ (संजय कदम) : अनैतिक संबंधातून प्रेमात अडसर ठरणाऱ्या पतीची पत्नीने प्रियकराच्या सहाय्य्यने बेदम मारहाण केली. या मारहाणीत पतीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेनंतर गपचुप पळून जाणाऱ्या पत्नी आणि प्रियकराला मानपाडा पोलिसानी अवघ्या तीन तासाच्या आत कोणताही सुगावा नसताना अथक प्रयत्नांनी अटक केली.


 सदर घटनेतील मयत मारुती लक्ष्मण हांडे (वय ५५, रा.कर्जत) याचे संध्या सिंग नावाचे मुलीसोबत प्रेमसंबंध होते. त्यातुन त्यांनी लग्न केल्यानंतर ते डोंबिवली जवळील कोळेगांव येथे वर्षभरापासून वास्तव्य करत होते. यादरम्यान संध्या सिंग हिचे त्याच भागात राहणारा वेदांत उर्फ गुड्डु शेट्टी याचेसोबत प्रेमसंबंध जुळले. हि बाब मारुती हांडे यांना माहिती पडल्यानंतर त्यांच्यात वाद होवु लागले. त्यामुळे संध्या सिंग व वेदांत शेट्टी यांनी त्यांचे प्रमातील अडसर दूर करणेसाठी मारुती हांडे यास जीवे ठार मारण्याचा प्लान केला, त्याप्रमाणे मारुती हांडे हा दुपारी त्याचे घरात जात असताना, वेदांत शेट्टी याने स्टंम्पने मारुती हांडे याचे डोक्यात, हातावर, पायावर, मारहाण केली. यामध्ये मारूती हांडे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर मुंबई येथील जेजे रुग्णालयात उपचार चालु असताना मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच मानपाडा पोलीस ठाण्याचे वपोनिरी. शेखर बागडे यांनी गुन्हे विभागाचे पोनिरी बाळासाहेब पवार, सपोनिरी सुरेश डांबरे, सपोनि अविनाश वनवे, सपोनि सुनिल तारमळे, सपोउपनि भानुदास काटकर, पोहेकॉ सोमनाथ टिकेकर, पोहेकॉ सुनिल पवार, पोहेकॉ संजय मासाळ, पोहेकॉ शिरीष पाटील, पोना प्रविण किनरे, पोना अनिल घुगे, पोना गणेश भोईर, पोकॉ अशोक आहेर, पोकों जय आव्हाड यांचे ३ पथक तयार करुन आरोपींचा शोध घेणेसाठी रवाना केले. 


संध्या सिंग व वेदांत शेट्टी यांचा त्यांचे पत्यावर शोध घेतला असता ते त्यांचे घरी मिळुन आले नाहीत. त्यामुळे आरोपींचा वेगवेगळया पध्दतीने शोध घेण्यात आला यामध्ये आरोपींचा कोणताही सुगावा नसताना मानपाडा पोलिसांनी तांत्रिक तपास आणि गुप्त बातमीदाराच्या सहाय्याने पळून जात असताना डोंबिवली परिसरातून अवघ्या ३ तासात अटक केली.थोडे नवीन जरा जुने