मोखाड्यात रयत शिक्षण संस्थेचे लोकनेते रामशेठ ठाकूर महाविद्यालय; शनिवारी नूतन इमारत उदघाटन व नामकरण समारंभ






संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार, नामदार रविंद्र चव्हाण, चेअरमन डॉ. अनिल पाटील, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांची लाभणार उपस्थिती 




पनवेल(प्रतिनिधी) सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, कला, क्रीडा, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रात सदैव उल्लेखनिय कार्य करणारे, दानशूर व्यक्तिमत्व लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या नावाने रयत शिक्षण संस्थेच्या शताब्दी वर्षानिमित्त बांधण्यात आलेल्या पालघर जिल्हयातील मोखाडा येथील महाविद्यालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन व लोकनेते रामशेठ ठाकूर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय नामकरण समारंभ शनिवार दिनांक ०८ एप्रिल २०२३ रोजी सकाळी ९. ३० वाजता होणार आहे. 



           यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पद्मविभूषण शरद पवार, संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्य दिलीप वळसे पाटील यांची उपस्थिती असणार असून या सोहळ्याचे समारंभ अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील हे असणार आहेत. यावेळी राज्याचे सार्वजनिक बांधकाम, अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि पालघरचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण, रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य तथा महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष लोकनेते रामशेठ ठाकूर, संस्थेचे जनरल बॉडी सदस्य सुनिल भुसारा, 



ज्येष्ठ पत्रकार व विचारवंत मधुकर भावे, आमदार प्रशांत ठाकूर, संस्थेच्या रायगड विभागीय अध्यक्ष बाळाराम पाटील, पालघर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम, मोखाडा नगरपंचायतीचे नगराध्यक्ष अमोल पाटील, मोखाडा पंचायत समितीचे सभापती भास्कर थेतले आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत,  अशी माहिती रयत शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन ऍड. भगीरथ शिंदे, सचिव डॉ. विठ्ठल शिवणकर, लोकनेते रामशेठ ठाकूर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. डी. भोर  यांनी दिली आहे. 


थोडे नवीन जरा जुने