शाश्वत शेती, ज्ञान, आरोग्य संदर्भात विविध सामाजिक उपक्रम

शाश्वत शेती, ज्ञान, आरोग्य संदर्भात विविध सामाजिक उपक्रम  

पनवेल(प्रतिनिधी) ग्यानम, आरोग्यम आणि शाश्वत उपजीविका या उपक्रमांतर्गत दीपक फर्टिलायझर्स अँड पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशन लिमिटेडने तळोजा परिसरात केलेल्या विविध उपक्रमाची माहिती देणारा कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अहवाल प्रकाशित केला. या अहवालात विविध प्रकारच्या समाजकल्याण कार्यक्रमांच्या आणि कंपनी कार्यरत असलेल्या परिसरातील समुदायांवर सकारात्मक परिणाम करणाऱ्या प्रकल्पांच्या यशस्वी अंमलबजावणीची माहिती देण्यात आली आहे.डीएफपीसीएलशी संलग्न असलेल्या ईशान्य फाउंडेशन (इसफॉन) या ना-नफा तत्वावर चालणाऱ्या संस्थेच्या माध्यमातून कंपनीने नवी मुंबई, रायगडमध्ये अनेक सीएएसआर प्रकल्प पूर्ण केले आहेत. यात सर्वांगीण ग्रामविकास आणि स्मार्ट उपक्रमांच्या माध्यमातून समुदायांचे सबलीकरण करणे,या संदर्भातील उपक्रमांचा समावेश आहे. या सीएसआर उपक्रमांच्या माध्यमातून तळोजा विभागातील २३४६४ हून अधिक स्थानिक लाभार्थींचा फायदा झाला आहे. सर्वांसाठी अधिक चांगले, न्याय्य भविष्य घडविण्यासाठी डीएफपीसीलीच्या निर्धाराची या सीएसआर अहवालाने पुष्टी केली आहे. डीएफपीसीएलच्या सीएसआर निर्धाराची माहिती देताना कंपनीचे प्रवक्ते म्हणाले, “डीएफपीसीएलमध्ये सीएसआरबद्दल आमची प्रतिबद्धता समाजाप्रती असलेली आमची प्रतिबद्धता दर्शवते. आमच्या कॉर्पोरेट कामकाजाच्या सर्व पैलूंमध्ये आम्ही शाश्वततेला चालना देतो. आरोग्य, शिक्षण, महिला व युवा सबलीकरण उपक्रमांचे यश आमच्या सर्वांसाठी चांगले भविष्य घडविण्याच्या आमच्या अतूट निर्धाराचे द्योतक आहे. ईशान्य फाउंडेशन महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी दुग्धव्यवसायविकास, आरोग्य, व्यावसायिक शिक्षण व उत्पन्ननिर्मिती उपक्रमांच्या माध्यमातून गेल्या १५ वर्षांपासून ग्रामीण समुदायाला सहाय्य करत असून महिला सबलीकरणावर भर देण्यात आला आहे. डीएफपीसील ज्या भागात काम करत आहे तेथे परिणामकारक उत्प्रेरकाची भूमिका निभावणाऱ्या ईशान्य फाउंडेशन तर्फे रोजगार कौशल्ये व स्रोत सहाय्यांच्या माध्यमातून उपजीविकेची सुरक्षित व शाश्वत साधने असलेला आत्मनिर्भर व प्रतिष्ठित समुदाय घडविण्यात येत आहे. ईशान्य फाउंडेशनच्या समुदाय विकास उपक्रमांचे २०२२-२३ या कालखंडातील विविध योजनांचे सर्व ठिकाणचे एकूण ३२८६९ लाभार्थी आहेत.


ग्यानम उपक्रमांतर्गत, इसफॉनने वळवली गावातील शाळेच्या इमारतीवर पत्र्याचे छत बसवून एक लक्षणीय सीएसआर प्रकल्प राबविला. तळोजा एमआयडीसी परिसरातील १६ रायगड जिल्हा परिषद शाळांमध्ये ५५ इंच स्मार्ट अँड्रॉइड टीव्ही, कीबोर्ड, माउस, शाळेच्या आवश्यकतेनुसार शालेय अभ्यासक्रम डिजिटल स्वरुपात असलेला पेन ड्राइव्ह उपलब्ध करून देत डिजिटल शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली.  इसफॉनच्या ग्यानम उपक्रमाने ५७ वर्गखोल्यांचे डिजिटलायझेशन, त्याचबरोबर इसफॉनतर्फे आठ शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील दहावी व बारावीच्या एक हजारहून अधिक विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले होते. इसफॉनच्या आरोग्यम उपक्रमाचा भाग म्हणून या संस्थेतर्फे लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्टच्या सहयोगाने पाले खुर्द गावात नेत्रतपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. त्या अनुषंगाने ८३० व्यक्तींपैकी ३८७ व्यक्तींना मोतिबिंदू असल्याचे निष्पन्न झाले आणि २३५ मोतिबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या. या व्यतिरिक्त ३२० व्यक्तींमध्ये दृष्टीदोष असल्याचे निदान झाले आणि त्यांना चष्मेवाटप करण्यात आले. या फाउंडेशनतर्फे मोबाइल क्लिनिकच्या माध्यमातून तळोजा एमआयडीसी परिसरातील २१ गावांमध्ये घरपोच आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यात येत आहेत आणि आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये आतापर्यंत १५७७१ व्यक्तींची मोफत आरोग्य तपासणी आणि मोफत औषध वाटप करण्यात आले आहे.  इसफॉनचा शेतकऱ्यांसाठी उपजीविका विकसित करण्याचा निर्धार आहे आणि त्यासाठी वाडी प्रकल्प राबविण्यात आला आहे. या प्रकल्पांतर्गत फाउंडेशनने ३८० शेतकऱ्यांना सहाय्य केले आहे. शाश्वत उपजीविका या प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांना अर्धा एकर जमिनीवर पुरतील एवढी आंब्याची ३० कलमे, कुंपणासाठी १०० जंगली झाडे, आवश्यक साधने पुरविण्यात आली, तसेच चार वर्षांपर्यंत (खते/कीटकनाशके) सहाय्य, जलस्रोत विकासासासाठी सहाय्य, मृदासंवर्धन व शेतकऱ्यांच्या क्षमताबांधणीसाठी मदत करण्यात आली. सीएसआर टीमतर्फे पनवेल ब्लॉकमधील गाढेश्वर आणि वांगणी गावांमध्ये किसान मेळावा आयोजित करण्यात आला होता. इसफॉनतर्फे सहभागींना नवे तंत्रज्ञान व साधने पुरवून उद्योग विकासासाठी सहाय्य करण्यात येते. तसेच समुदाय विकास व समाजकल्याण उपक्रमांतर्गत इसफॉनने घोट गावात समुदाय कट्टा बांधला, डोंगऱ्याचा पाडा गावात पीव्हीसी पाइपलाइन पाण्याचा हापसा बांधला, सीबीडी बेलापूर मधील पोलीस आयुक्तालयात डेस्कटॉप कॉम्प्युटरची देणगी देण्यात आली तसेच खैरणे गावात ओपन जिम उभारण्यात आली. थोडे नवीन जरा जुने