सामाजिक कार्यकर्ते रामेश्वर महाराज नरे यांना भारतरत्न गौरव श्री २०२३ ने करण्यात आले सन्मानित


सामाजिक कार्यकर्ते रामेश्वर ( महाराज ) नरे यांना ''भारतरत्न गौरव श्री -२०२३'' ने करण्यात आले सन्मानित
पनवेल दि. ३० ( संजय कदम ) : महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी सेवक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले तसेच रामेश्वर महाराज आदिवासी संस्थेचे अध्यक्ष रामेश्वर नरे यांना आदर्श मुंबई वृत्तपत्र व महाराष्ट्र न्युज १८ पोर्टल चॅनलच्या १२ व्या वर्धापन दिनानिमित्त समाजात तळागाळातील अन्याय पिडीत बांधवांसाठी समाजसेवा करण्याऱ्या व मदतीचा हात देणारे नरे यांना ''भारतरत्न गौरव श्री -२०२३'' पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले .  मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमात पनवेल निवासी रामेश्वर ( महाराज ) नरे यांना जेष्ठ पत्रकार, संपादक सुकृत खांडेकर यांच्या हस्ते ''भारतरत्न गौरव श्री -२०२३'' ने सन्मानित करण्यात आले. यावेळी प्रमुख मार्गदर्शक डॉ. पवन अग्रवाल , संयोजक भालचंद्र पाटे, आयोजक डॉ. संजय भोईर, गोरख लालजी साहनी आदी मान्यवर उपस्थित होते . यावेळी बोलताना रामेश्वर ( महाराज ) नरे यांनी सांगितले कि , अश्या प्रकारच्या पुरस्काराने सामाजिक कार्य करण्यासाठी अधिक ऊर्जा मिळते असे सांगितले . 


 - 
थोडे नवीन जरा जुने