राधाकृष्ण शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक मंडळाचा 21वा वर्धापन दिन उत्साहात साजरा.


राधाकृष्ण शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक मंडळाचा 21वा वर्धापन दिन उत्साहात साजरा.

उरण दि 15(विठ्ठल ममताबादे )राधाकृष्ण शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक मंडळाचा 21वा वर्धापन दिन सारडे ता. उरण येथे मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.


 या कार्यक्रमाचे उदघाटन सारडे ग्रामपंचायत सरपंच रोशन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. सदरप्रसंगी उपसरपंच जीवन पाटील आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य यांची उपस्थित होते. सुरुवातीला सारडे शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.


 नंतर गावातील दोन वर्षातील जवळ जवळ 20 इंजिनियर, डॉक्टर आणि एमबीए पदवी धारकांचा सत्कार आणि रात्री मनोरंजन कार्यक्रम म्हणून नृत्यरंग आयोजीत केला होता. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष सुनील पाटील,उपाध्यक्ष एम. एस पाटील, सचिव संदीप पाटील, खजिनदार वैजनाथ म्हात्रे हजर होते.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ए. डी. पाटील , सी डी.पाटील , विलास पाटिल, रविंद्र पाटील, मधुकर पाटील, नामदेव म्हात्रे, भारती अनंत पाटील यांनी मेहनत घेतली. सूत्रसंचालन विलास पाटिल यांनी तर प्रास्ताविक ए. डी.पाटील आणि आभार सुनिल पाटील यांनी केले . गावातील सर्वच क्षेत्रातील व्यक्ती याप्रसंगी हजर होते.थोडे नवीन जरा जुने