वावर्ले येथे धक्कादायक प्रकार उघड ,गाईंची कत्तल! करून कातडे माळरानावरवावर्ले येथे धक्कादायक प्रकार उघड ,गाईंची कत्तल! करून कातडे माळरानावर

 काशिनाथ जाधव : प्रतिनिधी
 पाताळगंगा: १६ मे,

          महड येथे नुकताच झालेल्या गायीची हत्या चे प्रकरण ताजे असतांना वावर्ले येथे पहाटेच्या सुमारांस गुरांची कत्तल करून कातडे माळरानावर टाकून देण्यात आले. मात्र ह्या गुरांच्या कातडी कोठून आली,त्यांचा नैसर्गिक मृत्यू झाला की त्यांची हत्या करून मास विक्री करण्यांच्या उद्देशाने कत्तल करण्यात आली आहे.असा प्रश्न सध्या या ग्रामस्थांच्या समोर निर्माण झाला आहे.या ठिकाणी सात ते आठ गुरांची कातडी पडल्यांचे दिसून आले असून या संदर्भात सखोल चौकशी होवून करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.


               
            खालापूर तालुक्यातील वावर्ले येथे ग्रूप ग्रामपंचायत हद्दीला लागून असणाऱ्या मोकळ्या जागेत गाईंची कत्तल करण्यात आल्याचे दिसून येत आहे,या ठिकाणी गाईचे मांस विक्री साठी काढून घेतल्यानंतर वरची कातडी ही एकाच ठिकाणी टाकण्यात आल्याचे चित्र आहे, समोर आल्यांचे पहावयांस मिळाले. गाई मारल्याचे हे भयाण चित्र समोर आल्याने परिसरात एकाच खळबळ उडाली आहे.उघड्यावर गाईची कातडी टाकून दिल्याने हा प्रकार समोर आला,आजवर गायी मारून टाकल्याचे ह्या भयाण चित्रावरून आपण अंदाज लावला जावू शकतो.            याच परिसरात आजवर गोवंशीय जनावरांची हत्या केल्या प्रकरणात गुन्हा देखील दाखल करण्यात आले आहेत.परंतु आता याच परिसरात मोठ्या प्रमाणात गोवंशीय जनावरांची कत्तल होत असल्याचे पुन्हा एकदा समोर आलं आहे.त्यामुळे यावर आता पोलीस प्रशासन काय कारवाई करते हे देखील पाहणे महत्वाचे ठरणार आहे.तर 


            एकूणच महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये गोवंश हत्या बंदी कायदा लागू आहे . देशी गाई आणि देशी बैलांचं संवर्धन करण्यासाठी आणि त्यांना कत्तलखान्यापासून वाचवण्यासाठी हा कायदा लागू केल्याचा दावा या राज्यांकडून केला जातो. गोवंश हत्या बंदी कायदा केल्याने खरंच जनावरांचे जतन होतय का? असा प्रश्न उपस्थित होतोय नाहीतर या सरकारच्या जागी खरोखर योगी सरकारची अवशक्यता असल्याचे गोवंशीय प्रेमीकडून बोलले जात आहे.

थोडे नवीन जरा जुने