गोल्डन ज्यूबली मित्र मंडळ सारडेचा 35 वा वर्धापन दिन विविध कार्यक्रमांनी होणार साजरा.


गोल्डन ज्यूबली मित्र मंडळ सारडेचा 35 वा वर्धापन दिन विविध कार्यक्रमांनी होणार साजरा.उरण दि 9(विठ्ठल ममताबादे )गोर गरिबांचे प्रश्न सोडविण्याच्या उद्देशाने तसेच विविध सामाजिक उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जोपसण्याच्या अनुषंगाने सन 1989 साली स्थापन झालेल्या गोल्डन ज्यूबली मित्र मंडळ सारडे ही सामाजिक संघटना गुरवार दि 11/5/2023 रोजी 35 व्या वर्षात पदार्पण करत आहे
. गोल्डन ज्युबली मित्र मंडळ सारडेचा 35 वा वर्धापन दिन उरण तालुक्यातील सारडे येथील राधाकृष्ण मंदिरात दि 11/5/2023 रोजी मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. दु. 2 ते 4 श्री सत्यनारायणाची महापूजा, सायंकाळी 4 ते 6 महाप्रसाद,रात्री 7 ते 8 प्रमुख पाहूण्यांचा सत्कार प्रदान सोहळा, नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य यांचा सत्कार, रात्री 9 ते 11 स्टेप आर्ट डान्स अकॅडमी प्रस्तुत जल्लोश सुवर्णयुगाचा नृत्य आणी हास्याचा सुरेख नजराणा असे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांचीही यावेळी उपस्थिती लाभणार आहे. अशी माहिती गोल्डन ज्यूबली मित्र मंडळ सारडेच्या वतीने देण्यात आली आहे.


थोडे नवीन जरा जुने