गोरगरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी स्वः भास्कर पाटील सामाजिक विकास संस्थेची स्थापना.







गोरगरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी स्वः भास्कर पाटील सामाजिक विकास संस्थेची स्थापना.


 उरण दि. 3 (विठ्ठल ममताबादे) उरण तालुक्यातील कोप्रोली येथील सामाजिक कार्यकर्ते तथा पोलिस पाटील म्हणूण ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य निस्वार्थी भावनेने समाजासाठी अर्पण केले असे स्वर्गीय भास्कर म्हात्रे (पाटील) यांनी पोलीस पाटील म्हणून कार्यरत असताना उरण पूर्व विभागातील गोरगरिबांना न्याय निवाडा करून न्याय मिळवून दिला. गोगरिबांच्या अडीअडचणी सोडविल्या. आयुष्यभर समाजाच्या, लोकांच्या कल्याणासाठी झटले.कधीही कोणताही स्वार्थ हेतू न बाळगता समाज पुढे कसा जाईल यासाठी त्यांनी आपला संपूर्ण देह झिजविला त्यांच्या या कार्याची व विचारांची परंपरा अशीच पुढे चालू ठेवावी व गोरगरिबांना, अडीअडचणीत असलेल्या नागरिकांना न्याय मिळावे. कोणावर अन्याय होऊ नये, तसेच विविध समस्या सोडविण्याच्या अनुषंगाने स्वर्गीय भास्कर म्हात्रे (पाटील) यांचे पणतू अँड प्रजन्य म्हात्रे यांनी सोमवार दि.1 मे 2023 रोजी अर्थातच महाराष्ट्र दिनी व आंतरराष्ट्रीय कामगार दिनी रात्री 9 वाजता - श्री गणेश मंदिर, कोप्रोली, उरण येथे स्व. भास्कर पाटील सामाजिक विकास संस्थेची स्थापना केली.





सर्वप्रथम गणेश पूजन, श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करण्यात आले त्यानंतर दीप प्रज्वल करून नारळ वाढविण्यात आले.संस्थेच्या लोगोचे उदघाटन सर्वांच्या उपस्थितीत करण्यात आले. व संस्थेचे उदघाटन झाल्याचे अधिकृत रित्या जाहीर करण्यात आले.सदर संस्थेच्या उदघाटनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 30 हून अधिक व्यक्तींचा शाल सन्मानचिन्ह गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला.




विविध नागरिकांनी, ग्रामस्थांनी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी संस्थे बद्दल मनोगत व्यक्त करून संस्थेच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.महाराष्ट्र दिन व कामगार दिन असल्याने रायगड भूषण वैभव घरत यांचा मराठमोळा पोवाडा व शाहिरी गीतांचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी ऍड.प्रजन्य म्हात्रे , ग्रामस्थ मंडळ कोप्रोलीचे पदाधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.भास्कर पाटील यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून ते ज्या पद्धतीने समाजाचे हीत करत होते त्याच पद्धतीने काम करण्या करिता ही संस्था स्थापन केली आहे.स्व.भास्कर पाटील सामाजिक विकास संस्थेच्या माध्यमातून गोरगरिबांना निस्वार्थी भावनेने न्याय मिळवून देणार तसेच विविध नागरी प्रश्न सोडविण्यास प्राधान्य देणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष प्रजन्य म्हात्रे यांनी यावेळी सांगीतले. 




"सदर संस्थेचा संस्थापक व अध्यक्ष जरी मी असलो तरी ही संस्था या गावाचा व या गावातील लोकांचा सर्वांगीन विकास होण्याकरिता स्थापन केले असून या संस्थेचे उद्दिष्टे हे या गावातील प्रलंबीत प्रश्न सोडविणे हेच आहे . ही संस्था या गावातील प्रत्येक व्यक्तीची असेल. जो या गावाच्या हिता करिता किंवा प्रलंबीत प्रश्न सोडविण्याकरिता कार्य करीत असेल त्याची आहे . सर्वांची अपेक्षा असते की , ग्रामपंचायतीने सर्व कार्ये करणे गरजेचे आहे परंतु सुजाण व जिम्मेदार नागरिक म्हणून प्रत्येकाची गवासाठी कार्ये करण्याची किंवा ग्रामपंचायतीची मदत करून गावाचे प्रश्न सोडविण्याची तेवढीच जिम्मेदारी आहे . 


                       मी आज सुशिक्षित आहे चांगला काम करतो परंतु माझे शिक्षणाचा व माझ्या ज्ञानाचा माझे मातीला , माझे लोकांना जेथे माझा जन्म झाला ज्याच्या सोबत मी लहानाचा मोठा झालो आहेत जर माझ्या ज्ञानाचा समाजाला, नागरिकांना झाला नाही तर या शिक्षणाचा व ज्ञानाचा काही उपयोग नाही . संस्था ही कागदेपत्री असते परंतु सर्व तरुणांनी व इतर नागरिकांनी एकत्र येवून अन्यायाला व भ्रष्टाचाराला वाचा फोडली पाहिजे व आपला समाज अन्याय मुक्त व भ्रष्टाचार मुक्त करून गावाचा व समाजाचा विकास करणे हे माझे मी कर्तव्य समजून सदर ची संस्था माझे पंजोबा स्व. भास्कर नारायण म्हात्रे ( भास्कर पाटील) यांना आदर्श मानून त्यांचेच नावाने "भास्कर पाटील सामजिक विकास संस्था" ही स्थापन केली आहे." असे यावेळी सदर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रजन्य म्हात्रे यांनी यावेळी सांगितले.सदर कार्यक्रमाचे सुंदर असे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रसिद्ध निवेदक नितेश पंडीत यांनी केले.एकंदरीत स्व. भास्कर पाटील सामाजिक विकास संस्था या सामाजिक संघटनेचे उदघाटन मोठया उत्साहात संपन्न झाले.


थोडे नवीन जरा जुने