भातशेतीच्या लोंब्या मध्ये दाणा तयार ,एक आठवड्यामध्ये भात कापणीस सुरुवातभातशेतीच्या लोंब्या मध्ये दाणा तयार ,एक आठवड्यामध्ये भात कापणीस सुरुवात

काशिनाथ जाधव : प्रतिनिधी 
पाताळगंगा : ३ मे, तालुक्यांच्या ठिकाणी कालव्याला पाणी येत नसले तरी सुद्धा,खालापूर तालुक्यातील निंबोडे येथे नदिच्या पाण्यावर भात शेतीची लागवड करण्यात आली.सदर शेतामध्ये लावलेल्या भाताच्या लोंब्या मध्ये दाणा तयार होण्याच्या मार्गावर असल्यामुळे भात शेतीने जणू सोनेरी शाल परिधान केली आहे.की असा भास जणू येथून जाणा-या वाटसरूला पडत असल्याचे भासत आहे.तर काही ठिकाणी भात कापणी सुरु झाली आहे. तर काही ठिकाणी एक आठवड्यामध्ये भात कापणीस सुरुवात केली असे प्राथमिक अंदाज शेतकरी वर्ग व्यक्त करीत आहे.                मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्या मध्ये वातावरणात फेरबदल होत असतात.यामुळे पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात होत असते.ते होऊ नये म्हणून शेतकरी एक आठवड्यामध्ये भात कापणीला सुरुवात केली जाईल.असे मत शेतात काम करीत असलेल्या शेतक-यांनी व्यक्त केले.उन्हाळी शेतीचे पिके हि शेतक-यांसाठी अत्यंत महत्वाची वाटतात.शिवाय उन्हाळी शेती मुळे काही जणांना रोजगार मिळत असते.पाताळगंगा नदि ही सातत्याने वाहत असल्यामुळे नदिच्या लगत असलेल्या उन्हाळी भात लागवड करणे शक्य आहे 


              उन्हाळी शेती ही नदिच्या पाण्याने करीत असल्याने नुकसान होण्याचा धोका संभवत नाही,तसेच पावसाळ्यात झालेल्या शेतीचे नुकसान उन्हाळी लावलेल्या शेतजमिनीतून भरून निघते.असे मत तिथे जमलेल्या शेतक-यांनी प्रतिनिधी शी बोलताना व्यक्त केले.
थोडे नवीन जरा जुने