स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांची विविध कार्यक्रमाला उपस्थिती


स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांची विविध कार्यक्रमाला उपस्थिती 


पनवेल दि ०३, (वार्ताहर) :स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांनी नुकतेच महाराष्ट्र दिनानिमित्त व कामगार दिनाचे औचित्य साधून पनवेल परिसरातील विविध कार्यक्रमांना उपस्थिती दर्शविली तसेच त्यांना मार्गदर्शन सुद्धा केले .                   स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांनी पनवेल शहरातील विविध टेम्पो संघटनांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात हजेरी लावली. पनवेल कुंभारवाडा येथील आयोजित कार्यक्रमात परदेशी यांनी महेश साळुंखे यांचे स्वागत केले. पेण साळंद येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती महोत्सवाला प्रमुख अतिथी म्हणून महेश साळुंखे यांनी उपस्थिती दर्शविली. व जनसमुदायाला मार्गदर्शन केले.
थोडे नवीन जरा जुने