विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांची घेतली नैना प्रकल्प उत्कर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी भेट


विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांची घेतली नैना प्रकल्प उत्कर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी भेट  
पनवेल दि ०३, (वार्ताहर) : नैना प्रकल्प उत्कर्ष समिती कडून महाराष्ट्र राज्य चे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांची भेट घेऊन नैना प्रकल्पला शेतकऱ्यांचा विरोध असल्याचे पत्र देऊन नैना प्रकल्प रद्द करण्याची मागणी केली.                     या वेळी विधानभवनातील विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांच्या दालनात नैना विरोधी शेतकरी उत्कर्ष समीतीचे अध्यक्ष वामन शेळके, शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) जिल्हासंपर्क प्रमुख बबनदादा पाटील, समितीचे बाळाराम फडके, नरेंद्र भोपी, शेखर शेळके, राज पाटील, गजानन पाटील, मोहन भोपी,सुधीर फडके,डिके भोपी, अभिमन्यू गोरे,पत्रकार शंकर वायदंडे आदी मान्यवरांनी उपस्थित राहून तसे लेखीपत्र दिले. 


यावेळी विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी लवकरच पनवेल येथे येऊन नैना प्रकल्प व विरार - अलिबाग कॉरिडॉर रस्ता प्रकल्पाची पाहणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले .थोडे नवीन जरा जुने