पनवेल महापालिका क्षेत्रातील भटक्या कुत्र्यांवर महापालिकेद्वारे विशेष मोहीम

पनवेल महापालिका क्षेत्रातील भटक्या कुत्र्यांवर महापालिकेद्वारे विशेष मोहीम
पनवेल दि.१२ (संजय कदम) : पनवेल महापालिका क्षेत्रात भटक्या कुत्र्यांचा दिवसेंदिवस वाढणाऱ्या त्रासामुळे नागरिक त्रस्त झाले होते. या भटक्या कुत्र्यांचा कायमचा बिमोड करण्याची मागणी त्रस्त नागरिकांकडून केली जात होती. 


त्यानुसार पनवेल महापालिकेच्या माध्यमातून या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात आला असून या भटक्या कुत्र्यांना पकडून त्यांचे निर्बिजीकरण करण्यात आले आहे. 
   पनवेल शहर आणि आजूबाजूच्या परिसरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला होता. शहरातील कचराकुंड्या, रेल्वे स्टेशन, मंदिर परिसर, शाळा पटांगण, सोसायट्यांच्या आवारात सर्वत्र या मोकाट कुत्र्यांचा वावर वाढल्याने नागरिक, शालेय विद्यार्थी कमालीचे त्रस्त झाले आहेत. हे कुत्रे रात्री उशिरा येणाऱ्या नागरिकांना लक्ष्य करीत असल्याने नागरिकांमध्ये दहशत पसरली होती. अनेकदा शाळकरी विद्यार्थ्यांचा कुत्र्यांकडून पाठलाग केला जात असल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या भटक्या कुत्र्यांचा कायमचा बिमोड करण्याची मागणी त्रस्त नागरिकांकडून केली जात होती. त्यानुसार पनवेल महापालिकेच्या माध्यमातून या भटक्या कुत्र्यांना पकडून त्यांचे निर्बीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांनी महापालिकेच्या कारभारावर समाधान व्यक्त केले आहे. थोडे नवीन जरा जुने