अल्पवयीन मुलीस फूस लावून पळून नेणाऱ्या तरुणास पोलिसांनी घेतले गोव्यामधून ताब्यात







अल्पवयीन मुलीस फूस लावून पळून नेणाऱ्या तरुणास पोलिसांनी घेतले गोव्यामधून ताब्यात
पनवेल दि.१२ (वार्ताहर) : कयामत से कयामत सिनेमाप्रमाणे पनवेल परिसरात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीस तिच्याच कॉलेजमधील अल्पवयीन तरुणाने फूस लावून गोवा राज्यात पळवून नेल्याची घटना घडली आहे. पनवेल शहर पोलिसांनी गोवा येथे जाऊन दोघेही तरुण-तरुणींना ताब्यात घेतले आहे. 



         पनवेल परिसरात वास्तव्यास असलेली एक १७ वर्षीय तरुणीचे तिच्याच कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या तरुणासोबत प्रेमसंबंध जुळले. त्यांनतर त्या दोघांनी घरच्यांना काहीच माहिती न देता गोवा राज्यात पलायन केले. या बाबतची तक्रार सदर तरुणीच्या घरच्यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्यात करताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील गिरी हे अधिक तपास करीत असताना गुप्त बातमीदार व तांत्रिक तपासाद्वारे या दोघांचा शोध घेत असताना ते दोघे जण गोवा राज्यातील कलंगुट बीच परिसरात वास्तव्यास असून तेथेच नोकरी करत असल्याचे आढळून आले.



 त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक सुनील गिरी, पोलीस हवालदार परेश म्हात्रे, महिला पोलीस कॉन्स्टेबल ज्योती कहांडल यांच्या पथकाने सदर ठिकाणी जाऊन तांत्रिक तपासाच्या आधारे सदर मुलगा काम करीत असल्याचा ठिकाणाहून ताब्यात घेतले व त्याने फूस लावून पळवून आणलेल्या मुलीबद्दल विचारणा केली असता तिच्या बाबतची माहिती पोलिसांना दिली



. त्यांनतर या पथकाने सांगितलेल्या ठिकाणी जाऊन सदर पीडित मुलीला ताब्यात घेतले व पनवेल शहर पोलीस ठाणे येथे आणण्यात आले. त्यांनतर कायदेशीर बाबींची पूर्तता करून सदर मुलीला तिच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. व मुलीला पळवून नेणाऱ्या तरुणाच्या विरोधात नियमानुसार गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक सुनील गिरी यांनी दिली आहे.


थोडे नवीन जरा जुने