दिनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजिवीका अभियानांत 'फेरीवाल्यांना सहाय्य या घटकांतर्गत पनवेल महानगरपालिकेची पथ विक्रेता निवडणुकीची आरक्षण सोडत आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहामध्ये काढण्यात आली.
उपायुक्त कैलास गावडे, सहाय्यक कामगार आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी शितल कुलकर्णी, महापालिका निवडणूक अधिकारी डी. डी. निकम, विभाग प्रमुख हरेश जाधव, तांत्रिक तज्ज्ञ विनया म्हात्रे, नवनाथ थोरात यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम घेण्यात आला. आठ नगर पथविक्रेता सदस्यांची २०२३ ते २०२८ करिताची पंचवार्षिक निवडणुक लवकरच गुप्त मतदान पध्दतीने घेण्यात येणार आहे. यामधील आठ जागापैकी ३ जागा सर्वसाधारण गटासाठी असणार आहेत. तसेच यातील एक जागा महिलांसाठी राखीव असणार आहे. अनुसूचित जाती, अनुसचित जमाती, इतर मागासवर्गीय अल्पसंख्यांक, विकलांग यांच्यासाठी प्रत्येकी एक जागा असणार आहे..
आज काढण्यात आलेल्या आरक्षण सोडतीमध्ये अनुसूचित जाती, अनुसचित जमाती, इतर मागासवर्गीय, अल्पसंख्यांक, विकलांग या प्रवर्गातून २ महिलांसाठीचे आरक्षण काढण्यात आले. त्यासाठी ५ चिठ्ठया तयार करण्यात आल्या होत्या. त्यातील दोन चिठ्ठया चौथीतील विद्यार्थी देवांश अनिल जाधव यांचेकडून पारदर्शक बरणीतून काढण्यात आल्या. यामध्ये अनुसूचित जमातीसाठी १ महिला व विकलांग व्यक्तीसाठी राखीव प्रवर्गामध्ये १ महिला असे आरक्षण निश्चित करण्यात आले. यावेळी आरक्षण सोडत तसेच निवडणुक कार्यक्रमाची सविस्तर माहिती उपायुक्त कैलास गावडे यांनी उपस्थित पथविक्रेत्येंना दिली. तसेच उपस्थितीतांच्या प्रश्नांना मान्यवरांनी उत्तरे दिली.
Tags
पनवेल