नैना विरोधात आंदोलन करणाऱ्या आमदार बाळाराम पाटील यांच्यासह प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात


नैना विरोधात आंदोलन करणाऱ्या आमदार बाळाराम पाटील यांच्यासह प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात


पनवेल दि.१२ (वार्ताहर) : पनवेल तालुक्यात नैना प्राधिकरण विरोधात वातावरण चांगलंच तापले आहे. नैना प्राधिकरणासंदर्भात देवद येथे सर्वेक्षण करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना विरोध करण्यासाठी गेलेले माजी आमदार बाळाराम पाटील आणि स्थानिक शेतकरी यांना पनवेल तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.    

 
     पनवेल तालुक्यात सिडकोतर्फे होणाऱ्या नैना प्रकल्पाला स्थानिक शेतकरी व ग्रामस्थांचा विरोध आहे. हे प्रकल्प शेतकऱ्यांवर अन्यायकारक असल्याचे स्थानिकांचे मत आहे. त्यामुळे याला प्रकल्पाला महाविकास आघाडीचा ठाम विरोध आहे. परंतु शासनाचे अधिकारी शेतकऱ्यांना, ग्रामस्थांना व रहिवाशांना विश्वासात न घेता प्रकल्प राबवण्यासाठी घडामोडी करीत आहेत. 


त्यानुसार नगर रचना परियोजना अंतर्गत देवद, सांगडे, भोकरपाडा, बेलवली, चिपळे, विहिघर येथील भुखंड वाटप करण्यासाठी देवद येथे आलेल्या अधिकाऱ्यांना विरोध करण्यासाठी गेलेल्या माजी आमदार बाळाराम पाटील यांच्यासह इतरांना पनवेल तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शासकीय कामात अडथळा आणल्याचा नावाखाली या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना पनवेल तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 


यावेळी ऍड सुरेश ठाकूर, माजी पंचायत समिती सदस्य राजेश केणी, शिवकरचे माजी सरपंच अनिल ढवळे यांच्यासह स्थानिक शेतकरी, प्रकल्पग्रस्त, सोसायट्यांचे पदाधिकारी, महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.थोडे नवीन जरा जुने