सेल्समनने लावला मालकाला पावणेतीन लाखाचा चुना






सेल्समनने लावला मालकाला पावणेतीन लाखाचा चुना
पनवेल दि.१२ (वार्ताहर) : नवीन पनवेल मधील प्लायवुड विक्रीच्या दुकानात सेल्समन म्हणून कामाला असलेल्या तरुणाने प्लायवुड विक्रीची इतर दुकानदाराकडून आलेली सुमारे पावणे तीन लाख रुपयांची रोख रक्कम दुकानात जमा न करता पलायन केल्याची घटना घडली आहे.


              रुपेश रविंद्र यादव (३४) असे या सेल्समनचे नाव असून खांदेश्वर पोलिसांनी त्याच्या विरोधात अपहाराचा गुन्हा दाखल केला आहे.
सदर प्रकरणातील फरार सेल्समन रुपेश यादव पनवेल मधील नेरे गाव येथे राहण्यास आहे. वर्षभरापूर्वी तो नवीन पनवेल, सेक्टर- १ मधील मयंक प्लाय अॅन्ड डोअर या प्लायवुड विक्रीच्या दुकानात सेल्समन म्हणून कामाला लागला होता



. मयंक प्लाय या दुकानातून पनवेल मधील इतर दुकानदारांना प्लायवुड तसेच फ्लश डोअर विक्री केले जात असल्याने सदर विक्री केलेल्या मालाची रक्कम वसूल करण्याचे काम रुपेश यादव करत होता. मागील ९ महिने रुपेश यादव याने व्यवस्थित काम केले. नेहमीप्रमाणे रुपेश पनवेल मधील वेगवेगळ्या दुकानदारांकडे पैशांचे कलेक्शन करण्यासाठी गेला होता.


 त्यानंतर त्याने सर्व दुकानदारांकडून पावणे तीन लाख रुपये वसूल केले. मात्र, सदर रक्कम दुकानात जमा न करता, त्याने ती रक्कम घेऊन पलायन केले. थोड्यावेळाने दुकानमालकाने रुपेशच्या मोबाईलवर संपर्क साधला असता, त्याचा मोबाईल बंद असल्याचे आढळून आले. त्यानंतर दुकान मालकाने रुपेशचा शोध घेतला. मात्र, तो सापडला नाही. अखेर दुकान मालक अरुणकुमार जैन याने खांदेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.


थोडे नवीन जरा जुने