तरुण बेपत्ता




तरुण बेपत्ता
पनवेल दि.२९ (संजय कदम) : कळंबोली साईनगर झोपडपटटी येथील आपल्या राहत्या घरातुन कोणास काहीएक न सांगता एक २० वर्षीय तरुण काठेतरी निघुन गेल्याने तो हरवल्याची तक्रार कळंबोली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.

 
विश्वास भिमा निर्माळे असे या तरुणाचे नाव असून त्याचा रंग सावळा, चेहरा उभट, डोळे काळे, नाक सरळ, केस काळे, उंची ५.७ फुट, बांधा मजबुत, मिशा बारीम, अंगात सफेत शर्ट व जिन्स पॅन्ट, पायात चप्पल असा पेहराव आहे.


 तसेच त्याला हिंदी, मराठी भाषा बोलता येत असून त्याच्या डाव्या डोळयाखाली जुन्या जखमाचे निशान आहे. सदर तरुणाबाबत कोणास काही माहिती असल्यास कळंबोली पोलीस ठाण्यात किंवा पोलीस हवालदार शिवानंद पुजारी यांच्याशी संपर्क साधावा.  



थोडे नवीन जरा जुने