जेएनपीटी-पनवेल मार्गावर अज्ञात वाहनांच्या धडकेत इसमाचा मृत्यू
जेएनपीटी-पनवेल मार्गावर अज्ञात वाहनांच्या धडकेत इसमाचा मृत्यू
पनवेल दि.२७ (संजय कदम) : पनवेल ते जेएनपीटी महामार्गावरील जय दुर्गा माता वजन काटयाजवळील सर्विसरोडवर अज्ञात वाहनाच्या धडकेत एका अनोळखी इसमाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेची नोंद उरण पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलीस मयत इसमाच्या नातेवाईकांचा शोध घेत आहेत.


  पनवेल ते जेएनपीटी महामार्गावरील सर्विसरोडवर जय दुर्गा माता वजन काटयाजवळील पांढ-या रंगाच्या ट्रेलरखाली सावली असल्याने अंदाजे ३० ते ३५ वयोगटातील अंगात पांढ-या रंगाचा फुल बाहयाचा शर्ट त्यावर हिरव्या रंगाच्या लाईन्स असणारा, त्याचे आतुन एक राखाडी रंगाची बनियान, काळया रंगाची पॅन्ट परिधान केलेला अनोळखी इसम बसलेला असताना कोणत्यातरी अज्ञात वाहनावरील अज्ञात चालकाने त्याचा ताब्यातील वाहन भरधाव वेगात चालवत बेदरकारपणे रोडच्या परीस्थितीकडे दुर्लक्ष करून या इसमास ठोकर मारली. या अपघातात सदर इसमाच्या डोक्यास गंभीर दुखापत होवुन तो जागीच मृत्यू पावला. मयत इसमाच्या नातेवाईकांचा शोध पोलीस घेत असून या इसमाबाबत किंवा त्याच्या नातेवाइकांबाबत कोणास काही माहिती असल्यास उरण पोलीस ठाणे किंवा पोलीस उपनिरीक्षक एस आर कांबळे यांच्याशी संपर्क साधावा.थोडे नवीन जरा जुने