पनवेल एजुकेशन सोसायटी संचालित याकुब बेग हायस्कूल व जुनियर कॉलेज व पी.ई.एस इंग्लिश जुनियर कॉलेजचे बारावी परीक्षेत दिमाखदार यश







*पनवेल एजुकेशन सोसायटी संचालित याकुब बेग हायस्कूल व जुनियर कॉलेज व पी.ई.एस इंग्लिश जुनियर कॉलेजचे बारावी परीक्षेत दिमाखदार यश*
पी.ई.एस इंग्लिश जूनियर कॉलेजचा सायन्स विभागाचा निकाल १००%, कॉमर्सचा ९८.०२% तर आर्ट्स चा निकाल ९२.८५%


पनवेल दि.२७ (संजय कदम) : याकुब बेग हायस्कूल व जूनियर कॉलेज कॉमर्सचा निकाल ९१.३०% तर आर्ट्स चा निकाल ७७.७७%
पनवेल : पनवेल एजुकेशन सोसायटी संचालित याकुब बेग हायस्कूल व जुनियर कॉलेज व पी.ई.एस इंग्लिश जुनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी HSC परीक्षेत दिमाखदार यश मिळवले आहे. याकुब बेग हायस्कूल व जुनियर कॉलेज कॉमर्सचा निकाल ९१.३०% तर आर्ट्स चा निकाल ७७.७७% लागला. तर पी.ई.एस इंग्लिश जुनियर कॉलेजचा सायन्स विभागाचा निकाल १००% तर कॉमर्सचा निकाल ९८.०२% व आर्ट्स चा निकाल ९२.८५% लागला


 याकुब बेग जुनियर कॉलेजमध्ये कॉमर्स शाखेत कॉलेजमध्ये प्रथम येण्याचा मान शेख नमरा अस्लम या विद्यार्थिनीने ८३.१७ % गुण मिळवून मिळवला. शेख नसरीन शब्बीर ही विद्यार्थिनी ७६.१३% गुण मिळवून द्वितीय तर शेख जारा रफिक ही विद्यार्थिनी ७४.१७% गुण मिळवून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली.




 आर्ट्स शाखेमध्ये कॉलेजमध्ये प्रथम येण्याचा मान सादिया परवीन मुतीउर रेहमान या विद्यार्थिनीने ७२% गुण मिळवून मिळवला. कर्जीकर बरीरा रफिक ही विद्यार्थिनी ६५% गुण मिळवून द्वितीय तर खान अक्सा सुलेमान ही विद्यार्थिनी ६४.५०% गुण मिळवून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली. पी.ई.एस इंग्लिश जुनियर कॉलेजमध्ये कॉमर्स शाखेत कॉलेजमध्ये प्रथम येण्याचा मान ढेपे युसुफ शाहीद या विद्यार्थ्याने ९२.१७ % गुण मिळवून मिळवला. सबा परवीन करम अली ही विद्यार्थिनी ८९% गुण मिळवून द्वितीय तर गोलंदाज आरफा असिफ ही विद्यार्थिनी ८६% गुण मिळवून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली.



 आर्ट्स शाखेमध्ये कॉलेजमध्ये प्रथम येण्याचा मान खान जोया अब्दुल रौफ या विद्यार्थिनीने ७६.१७% गुण मिळवून मिळवला. पावले दानिया शाहनवाझ ही विद्यार्थिनी ७४.६७% गुण मिळवून द्वितीय क्रमांकाने तर खान समिउन्निसा अझीमुल हक ही विद्यार्थिनी ७४.५०% गुण मिळवून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली. पी.ई.एस इंग्लिश जुनियर कॉलेजमध्ये सायन्स शाखेचा निकाल पुन्हा १००% लागला. सायन्स शाखेत कॉलेजमध्ये प्रथम येण्याचा मान अन्सारी उझमा अकिल या विद्यार्थिनीने ७५.५० % गुण मिळवून मिळवला.



 तसेच पटेल मोहम्मद अली असीम याने ७४.३३% गुण मिळवून सायन्स शाखेत कॉलेजमध्ये द्वितीय येण्याचा मान पटकावला तर हजवाने इकरा नदीम ही विद्यार्थिनी ७३.८३% गुण मिळवून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली. या घवघवीत यशाबद्दल पनवेल एजुकेशन सोसायटीचे अध्यक्ष इक्बाल हुसैन काझी संस्थेचे सर्व पदाधिकारी व सदस्यांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे, त्यांच्या पालकांचे, शिक्षकांचे तसेच दोन्ही कॉलेजचे प्राचार्य यांचे अभिनंदन केले आहे.



थोडे नवीन जरा जुने