हार्बर मार्गावर वाशी-पनवेलदरम्यान रविवारी (ता. १४) घेण्यात आलेल्या मेगाब्लॉकमुळे चाकरमान्यांसह बाहेरगावी जाणाऱ्यांचे चांगलेच हाल झाले. यावेळी ट्रान्स हार्बर मार्गावरील ठाणे ते वाशी ही सेवा सुरू होती; परंतु सध्या सुट्ट्यांचा हंगाम असल्याने लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी पनवेल, सीएसएमटी तसेच कल्याण स्थानक गाठताना प्रवाशांची चांगलीच दमछाक झाली होती..
ट्रान्स हार्बर मार्गावर मेगाब्लॉक असल्यामुळे रेल्वे स्थानक परिसरात शुकशुकाट पसरला होता; तर एनएमएमटीच्या बस स्थानकांवर मात्र प्रवाशांची गर्दी जमली होती; तर मेगाब्लॉकमुळे रेल्वेच्या फेन्या देखील उशिराने असल्यामुळे रिक्षाने तसेच बस, एनएनएमटीने प्रवास करवा लागला;
तर भरउन्हामुळे प्रवाशांना रेल्वे स्थानकांत अडकून पडावे लागले होते. यावेळी रिक्षाचालकांकडूनदेखील प्रवाशांच्या अडचणीचा फायदा घेत वाढीव भाडे आकारण्यात आले होते. अशातच आज सुट्टीचा दिवस असल्याने अनेक जण घराबाहेर पडले होते. त्यात उन्हाचा पारादेखील ४० अंशापर्यंत असल्यामुळे बस स्टॉपवर बसची वाट पाहणाऱ्या प्रवाशांच्या अंगाची लाहीलाही होत होती.
Tags
पनवेल