शवविच्छेदन गृहात घाणीचे साम्राज्य







शवविच्छेदन गृहात घाणीचे साम्राज्य
कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात
शवविच्छेदन गृहाच्या ठिकाणी कित्येक महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून, त्यातून रोगराई पसरण्याची साधार भीती
व्यक्त केली जात आहे.


शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी प्रशस्त असे हे रुग्णालय आहे, यात शहरातून, तसेच तालुक्यातून रुग्ण उपचारासाठी येत असतात. या सणालयाच्या आवारात शवविच्छेदन गृह आहे. तर याच आवारात डॉक्टर, परिचारिकांना राहण्यासाठी मोठी इमारत देखील आहे. 


मात्र कित्येक वर्षे ही इमारत दुरुस्तीविना धूळ खात आहे. त्यामुळे डॉक्टर, परिचारिकांची राहण्याची गैरसोय होत आहे. आजवर या इमारतीची कुठल्याही प्रकारची दुरुस्ती, रंगरंगोटी झाली नाही. शवविच्छेदन गृहाच्या आवारात मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य तयार झाले आहे, जीर्ण झालेल्या इमारतीवर झाडेझुडपे उगवली आहेत. त्यामुळे पालापाचोळ्याचा खच पडला आहे.



थोडे नवीन जरा जुने