मच्छीविक्रेत्या महिलेची रोख रक्कम लंपास


मच्छीविक्रेत्या महिलेची रोख रक्कम लंपास
पनवेल दि २२ (संजय कदम) : पनवेल शहरातील उरण नाका येथे मच्छीविक्रीचा व्यवसाय करणाऱ्या एका महिलेची ६० हजार रुपये रोख रक्कम असलेली पिशवी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली आहे. याबाबत पनवेल शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोराविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.             लीला भगत या शहरातील उरण नाका येथे मच्छी विक्री चा व्यवसाय करतात. नेहमीप्रमाणे त्या आपल्या जागेवर व्यवसाय करत असताना त्यांच्या व्यवसायातुन जमा झालेली ६० हजार रुपयाची रोख रक्कम एका पिशवीत बाजूला ठेवली होती

. मात्र अज्ञात चोरट्याने त्यांची नजर चुकवून सदर [पिशवी लंपास केली. थोड्या वेळात पिशवी गायब झाल्याचे लक्षात येताच त्यांनी याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात दाखल केली. याप्रकरणी पनवेल शहर पोलीस पुढील तपास करीत आहेत.


थोडे नवीन जरा जुने