श्री साई नारायण बाबा यांच्या द्वितीय पुण्यतिथी निमित्त ‘श्रीमद भागवत कथा सप्ताह’ चे आयोजन





श्री साई नारायण बाबा यांच्या द्वितीय पुण्यतिथी निमित्त ‘श्रीमद भागवत कथा सप्ताह’ चे आयोजन
पनवेल दि.०९ (संजय कदम) : सद्गुरू श्री साई नारायण बाबा यांच्या द्वितीय पुण्यतिथीनिमित्त पनवेलच्या साईबाबा मंदिर येथे शनिवार १३ मे ते १९ मे पर्यंत ‘श्रीमद भागवत कथा सप्ताह’ चे आयोजन करण्यात आले आहे. 



              पनवेल रेल्वे स्टेशन रोडवरील श्री नारायण बाबा आश्रम येथील श्री साई बाबा मंदिरात पूज्य सदगुरु श्री साई नारायण बाबा यांच्या द्वितीय पुण्यतिथी निमित्त शनिवार १३ मे पासून ते शुक्रवार १९ मे पर्यंत संध्याकाळी ५ ते ८ च्या दरम्यान पूज्य श्री विद्यांशु महाराज (अयोध्या धाम वाले) यांचे ‘श्रीमद भागवत कथा सप्ताह’ चे आयोजन करण्यात आले आहे. यांनतर शेज आरती, महाप्रसाद देखील होणार आहे. तरी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहावे असे आवाहन श्री भगवती साई संस्थानच्या श्री साई नारायण बाबा आश्रमच्या वतीने करण्यात आले आहे.


थोडे नवीन जरा जुने