दिल्लीतील कुस्तीपटूंचे आंदोलन चिरडण्याविरोधात पनवेल युवक काँग्रेसच्यावतीने मेणबत्त्या पेटवून निषेध


दिल्लीतील कुस्तीपटूंचे आंदोलन चिरडण्याविरोधात पनवेल युवक काँग्रेसच्यावतीने मेणबत्त्या पेटवून निषेध
पनवेल दि.०६ (संजय कदम) : दिल्ली येथे जंतर-मंतरवर बसलेल्या देशातील ऑलम्पिक मेडल विजेत्या कुस्तीपटूंच्या धरणे आंदोलनाला चिरडण्याचा काम दिल्ली पोलिसांकडून रात्री करण्यात आला होता, त्याच्या निषेधार्थ पनवेल शहर जिल्हा युवक काँग्रेसच्यावतीने महात्मा गांधी पुतळ्याजवळ मेणबत्ती लावून निषेध करण्यात आला. 


               यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव विश्वजीत पाटील, जिल्हाध्यक्ष हेमराज म्हात्रे, महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष निर्मला म्हात्रे, नवीन पनवेल शहराध्यक्ष राहुल जानवरकर, युवक उपाध्यक्ष राहुल सावंत, पनवेल शहर अध्यक्ष संदेश ठाणगे , आदित्य गायकवाड व इतर पदाधिकारी उपस्थित होते.थोडे नवीन जरा जुने