कामगार नेते महेंद्र घरत यांच्या यशस्वी मध्यस्थीने इकोग्लोब पॅकेजिंग मधील कामगारांना तब्बल 8000 रुपयाची पगारवाढ


कामगार नेते महेंद्र घरत यांच्या यशस्वी मध्यस्थीने इकोग्लोब पॅकेजिंग मधील कामगारांना तब्बल 8000 रुपयाची पगारवाढ
पनवेल दि.०६ (वार्ताहर) : न्यू मेरिटाईम अँड जनरल कामगार संघटनेची सभासद असलेल्या पेण येथील इकोग्लोब पॅकेजिंग प्रा.लि. या कंपनीतील कामगारांसाठी तब्बल ८००० रुपये पगारवाढीचा करार संघटनेच्या माध्यमातून करण्यात आला. करारनाम्यानुसार कामगारांना महागाई भत्ता, एक ग्रॉस सॅलरी बोनस व इतर सोई सुविधा देण्याचे मान्य कराण्यात आले आहे. 


यावेळी संघटनेचे अध्यक्ष महेंद्र घरत आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, कंपनीच्या प्रगतीबरोबर कामगारांचीही आर्थिक परिस्थिती सुधारावयास हवी.तसेच कामगारांनी पण कंपनी आपली समजून प्रामाणिक पणे काम करावे व आपल्या मेहनतीचा मोबदला हक्काने घ्यावा असे सांगितले.  


      कामगार हाच संघटनेचा आत्मा हे ध्येय्य ठेवुन कामगारांना स्वाभिमानाने जगण्यासाठी प्रयत्न करणारे कामगार नेते महेंद्र घरत यांच्या नेतृत्वातील न्यू मेरिटाईम अँड जनरल कामगार संघटना हि एकमेव संघटना आहे. संघटनेच्या माध्यमातून दरवर्षी १८ ते २० पगारवाढीचे करार केले जातात.काही महिन्यांपूर्वीच कामगारांनी सभासदत्व स्विकारलेल्या पेण येथील इकोग्लोब पॅकेजिंग प्रा.लि. या कंपनीतील कामगारांसाठी तब्बल ८००० रुपये पगारवाढीचा करार संघटनेच्या माध्यमातून करण्यात आला. करारनाम्यानुसार कामगारांना महागाई भत्ता, एक ग्रॉस सॅलरी बोनस व इतर सोई सुविधा देण्याचे मान्य कराण्यात आले आहे. 


या करारनाम्या प्रसंगी न्यू मेरिटाईम अँड जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष कामगार नेते महेंद्र घरत, सरचिटणीस वैभव पाटील, उपाध्यक्ष किरीट पाटील, कंपनीचे डायरेक्टर सिद्धी अय्यर, काँग्रेस नेते मिलिंद पाडगांवकर, मार्तंड नाखवा, संघटक लंकेश ठाकूर, आदित्य घरत, आनंद ठाकूर, अंगद ठाकूर, राजेश ठाकूर, अजित ठाकूर, योगेश रसाळ, विवेक म्हात्रे, राजेंद्र भगत तर कामगार प्रतिनिधी रोहन अंबाडे, जगदीश पाटील, सुनील दिघे, राम ठोंबरा व युवराज पाटील आदी उपस्थित होते.
थोडे नवीन जरा जुने