स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंती निमित्त रविवारी महा रक्तदान शिबीर

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंती निमित्त रविवारी महा रक्तदान शिबीर 

पनवेल(प्रतिनिधी) स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या १४० व्या जयंती निमित्त रविवार दिनांक २८ मे रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत खांदा कॉलनी येथील सीकेटी महाविद्यालयात महा रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे. 


          या शिबिरासाठी जनहित संवर्धक मंडळ, भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राजे शिवराय प्रतिष्टान, भारत विकास परिषद, कच्छ युवक संघ, रोटरी क्लब ऑफ पनवेल, शिव प्रतिष्ठान, हिंदुस्थान एन एस एस पीजी मुंबई विद्यापीठ, ब्राम्हण सभा नवीन पनवेल, विश्व हिंदू परिषद, संस्कार भारती, सुधा साहित्य सामाजिक संस्था यांचे संयोजन सहभाग तर रक्तपेढी म्हणून टाटा हॉस्पिटल खारघर व परेल ब्लड बँक यांचे सहाय्य असणार आहेत.


 अधिक माहितीसाठी स्वप्नेश विचारे - ९९८७०९३२१४, अक्षय मिसाळ - ७२१८००४४१८ किंवा चंद्रकांत ताम्हणकर - ९७०२३६३०३३ यांच्याशी संपर्क साधावा, तसेच या महारक्तदान शिबिरात जास्तीत जास्त रक्तदात्यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले आहे. थोडे नवीन जरा जुने