शनिवारी पनवेलमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर इंग्लंड ते अंदमान


शनिवारी पनवेलमध्ये 'स्वातंत्र्यवीर सावरकर इंग्लंड ते अंदमान'

पनवेल (प्रतिनिधी) नववर्ष स्वागत समिती पनवेल यंदा २५ वा स्थापना वर्ष साजरा करीत असून त्या अनुषंगाने वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. त्यानुसार स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला म्हणजेच २७ मे रोजी पनवेलमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवन संघर्षावर आधारित व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.

            शहरातील श्री. विरुपाक्ष मंगल कार्यालयात शनिवार दिनांक २७ मे रोजी सायंकाळी ०६ वाजता स्वा. सावरकरांच्या जीवन चरित्राचे अभ्यासक पार्थ बावस्कर यांचे ' स्वातंत्र्यवीर सावरकर इंग्लंड ते अंदमान' या विषयावर व्याख्यान होणार असून या व्याख्यानाचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन नववर्ष स्वागत समिती पनवेल अध्यक्ष अमित ओझे, श्री विरुपाक्ष महादेव मंदिर न्यास पनवेल व केशवस्मृती नागरी सहकारी पतपेढी यांनी केले आहे. थोडे नवीन जरा जुने