पनवेल दि.१५ (संजय कदम) : पनवेल परिसरात दिवसेंदिवस बेवारस वाहनांच्या संख्येचे वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. या बेवारस वाहनांवर कारवाई करून तेथून त्वरित हटवा अशी मागणी नागरिकांकडून वाहतूक शाखा व महापालिकेकडे करण्यात येत आहे.
पनवेल शहर परिसरात मोकळ्या रस्त्यावर बेवारस वाहनांचा खच पडला आहे. त्यामुळे शहरातील मोक्याचा रस्त्याला या वाहनांमुळे अडथळा निर्माण होत आहे. याबाबत नागरिकांनी वाहतूक पोलिस आणि पालिका प्रशासनाकडे अनेक वेळा तक्रार करूनदेखील या बेवारस वाहनांवर कारवाई केली गेली नाही. मध्यंतरी पालिकेने बेवारस वाहनांवर कारवाईचा बडगा उचलला होता.
मात्र, ही मोहीमदेखील काही काळापासून थंडावली आहे. त्यामुळे महापालिकेने पुन्हा एकदा हि मोहीम सुरु करावी व पनवेल परिसरातील रस्ते मोकळे करावे अशी मागणी नागरिक करीत आहेत.
Tags
पनवेल