पनवेल दि.१४ (संजय कदम) : सद्गुरू श्री साई नारायण बाबा यांच्या द्वितीय पुण्यतिथीनिमित्त पनवेलच्या साईबाबा मंदिर येथे १९ मे पर्यंत ‘श्रीमद भागवत कथा सप्ताह’ चे आयोजन करण्यात आले आहे याला मोठ्या प्रमाणात साई भक्तांची गर्दी होत आहे .
पनवेल रेल्वे स्टेशन रोडवरील श्री नारायण बाबा आश्रम येथील श्री साई बाबा मंदिरात पूज्य सदगुरु श्री साई नारायण बाबा यांच्या द्वितीय पुण्यतिथी निमित्त शुक्रवार १९ मे पर्यंत संध्याकाळी ५ ते ८ च्या दरम्यान पूज्य श्री विद्यांशु महाराज (अयोध्या धाम वाले) यांचे ‘श्रीमद भागवत कथा सप्ताह’ चे आयोजन करण्यात आले आहे.
या नतर शेज आरती, महाप्रसाद देखील होत असतो . या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने भाविकांची उपस्थितीती असल्याची माहिती श्री भगवती साई संस्थानच्या श्री साई नारायण बाबा आश्रमच्या वतीने देण्यात आली आहे.
Tags
पनवेल