पनवेल दि . १४ (वार्ताहर ) : पनवेल येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे "विभाग प्रमुख चषक २०२३" च्या किक्रेट स्पर्धेचे उदघाट्न शिवसेना जिल्हाप्रमुख रायगड शिरीष घरत यांच्या उपस्थीतीत व ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांच्या साथीने करण्यात आले . यावेळी सर्व संघाना तसेच आयोजक प्रशांत नरसाळे व त्यांच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या .
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख रायगड शिरीष घरत यांच्यासह ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे , उपजिल्हा प्रमुख रामदास पाटील, तालुका प्रमुख संदीप तांडेल, विधानसभा समन्वयक प्रदीप ठाकूर, महानगर समन्वयक दिपक घरत, उपमहानगर प्रमुख अच्युत मनोरे, कैलास पाटील, पनवेल शहर प्रमुख प्रवीण जाधव, कळंबोली शहर प्रमुख सूर्यकांत म्हसकर, नवीन पनवेल शहर प्रमुख यतीन देशमुख, उपजिल्हा युवासेना अधिकारी अवचित राऊत , अरुण ठाकूर आदींसह इतर पदाधिकारी व शिवसैनिक ,महिला आघाडी व युवासेना मोठ्या संख्येने उपस्थीत होते.
Tags
पनवेल