कामगारांनी घेतला लाभ.
उरण दि २(विठ्ठल ममताबादे )
उरण नगर परिषद कार्यालय येथे सफाई कामगार तसेच सर्व कर्मचारी यांच्या करिता दि. १ मे २०२३ रोजी महाराष्ट्र दिन आणि कामगार दिना निमित्त श्री पॅथाॅलाॅजी लॅबोरेटरीच्या प्रोप्रायटर डॉ. नयना ठाकूर यांच्या सौजन्याने आणि वुई क्लब उरण, म्युनिसिपल एम्प्लाईज युनियन आणि शुश्रूशा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, पनवेल यांच्या सहकार्याने "आरोग्य शिबिराचे" आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे उद्घाटन उरण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी राहूल इंगळे यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी ज्येष्ठ नेत्र चिकित्सक तज्ञ , जे जे हाॅस्पिटलचे डिन म्हणून सर्वाधीक काळ काम पाहणारे जगप्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉ. तात्यासाहेब लहाने हे उपस्थित होते.
तसेच म्युनिसिपल एम्प्लाईज युनियनचे कार्याध्यक्ष संतोष पवार, डॉ बी एम कालेल वैद्यकीय अधीक्षक , तालूका आरोग्य अधिकारी डॉ. ईटकरे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर, माजी नगराध्यक्ष रवी भोईर, वुई आरती भाटिया, श्रीमती जैन मॅडम, श्रीमती काटदरे मॅडम, अनिल जगधनी, उरण नगरपरिषद पतपेढीचे चेअरमन मधुकर भोईर, सागर चौकार, म्युनिसिपल एम्प्लाईज युनियनचे उपाध्यक्ष हरेश जाधव
, धनेश कासारे, दत्ता मोरे ,नरेश पावसकर, धनंजय आंब्रे, विशाल गायकवाड आणि मोठ्याप्रमाणात सफाई कामगार तसेच इतर कर्मचारी उपस्थित होते.कर्मचाऱ्यांनी या आरोग्य शिबिराचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतला.
Tags
उरण