सारडे ग्रामविकास समितीच्या वतीने मंत्रालय महाराष्ट्र राज्य,मुंबई येथे सारडे गावठाणविस्तारचे प्राथमिक प्रस्ताव सादर.






सारडे ग्रामविकास समितीच्या वतीने मंत्रालय महाराष्ट्र राज्य,मुंबई येथे सारडे गावठाणविस्तारचे प्राथमिक प्रस्ताव सादर.





उरण दि 18(विठ्ठल ममताबादे )शासनाच्या एमआयडीसी मार्फत सारडे,वशेणी,पुनाडे येथील जमिनी संपादन करण्याचा घाट चालू असताना यामध्ये जमिनी व शेत जमीनीवरील घरे बाधित होणार आहेत ही धोक्याची घंटा ओळखून सारडे ग्रामस्थांनी सारडे ग्रामविकास समितीची एकमताने स्थापना केली



.समितीच्या माध्यमातून लोकसहभाग व लोकवर्गणीतून गावठाणविस्तार साठी पहिले पाऊल म्हणून प्राथमिक प्रस्ताव पंतप्रधान कार्यालय ते मंत्रालयातील मुख्यमंत्री, उप-मुख्यमंत्री ,महसूल विभाग,नगरविकास,पुनर्वसन अश्या सर्व विभाग,त्या विभागांचे मंत्री, सचिव,अश्या 32 ठिकाणी प्रत्यक्षरीत्या गावठाणविस्तार बाबत प्रस्ताव देण्यात आले


.यामध्ये जिल्हाधिकारि, प्रांत,तहसिलदार, बीडीओ पर्यंतच्या विभागांचा समावेश आहे.जिल्हाधिकारी व जिल्हा भुअभिलेख यांना वरिष्ठ स्तरावरून सीमांकणाचे व सर्व्हेक्षणाचे आदेश न झाल्यास सारडे ग्रामविकास समिती लवकरच सारडे गावचे सीमांकन लोकवर्गणीतून व लोकसहभागातून स्वत: करेल अशी माहिती सारडे ग्रामविकास समितीचे अध्यक्ष मनोज पाटील यांनी दिली.


थोडे नवीन जरा जुने