पनवेल दि. २३ (संजय कदम) : पनवेल तालुक्यातील जांभिवली कातकरवाडी येथून एक २७ वर्षीय तरुण बेपत्ता झाला आहे. याप्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.
अर्जुन रामदास पवार असे या तरुणाचे नाव असून त्याची उंची ५ फूट ४ इंच. रंग सावळा, केस काळे लांब वाढलेले, अंगाने सडपातळ, चेहरा उभट तसेच अंगात फुल बाह्यांचा लाल रंगाचा शर्ट, काळ्या रंगाची ट्रॅक पॅन्ट व पायात काळ्या रंगाची चप्पल असा त्याचा वर्णन आहे
. सदर तरुणाबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास पनवेल शहर पोलीस ठाणे दूरध्वनी क्र ०२२-२७४५२३३३ किंवा पोलीस हवालदार सतीश जवरे (मो.८३५६८१३७३२) यांच्याशी संपर्क साधावा.
Tags
पनवेल