प्रभाग क्रंमाक १४ मध्ये पावसाळयापुर्वी योग्य प्रकारे नालेसफाई करण्याबाबत शिवसेनेचे आयुक्त गणेश देशमुख यांना निवेदन
पनवेल दि.१८ (संजय कदम) : पनवेल महापालिका क्षेत्रातील प्रभाग १४ मधील नालेसफाई पावसाळयापुर्वी योग्य प्रकारे व्हावी अशी मागणी शिवसेना विभागप्रमुख आशिष पनवेलकर यांनी पनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांना निवेदनाद्वारे केली आहे.
यासंदर्भात आशिष पनवेलकर यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, प्रभाग क १४ मध्ये कुंभारवाडा पासुन ते बंदररोड पर्यत मोठमोठे नाले आहे त्यामुळे या ठिकाणची नालेसफाई पावसाळयापुर्वी होणे आवश्यक आहे. त्यामुळे याठिकाणची सफाई योग्य वेळेस व चांगल्या प्रकारे झाली तर पावसाळयामध्ये पावसाचे पाणी तुंबणार नाही. त्यामुळे प्रभाग १४ मधील नालेसफाई पावसाळयापुर्वी योग्य प्रकारे करा अशी मागणी त्यांनी निवेदनात केली आहे
Tags
पनवेल