पावसाळ्यापूर्वी खवय्यांचा सुकी मच्छी खरेदी करण्याकडे कलपावसाळ्यापूर्वी खवय्यांचा सुकी मच्छी खरेदी करण्याकडे कल
पनवेल दि.१८ (वार्ताहर) : पावसाळ्यापूर्वी खवय्यांचा सुकी मच्छी खरेदी करण्याकडे कल वाढल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे सुकी मच्छी खरेदी करण्यासाठी नागरिकांची बाजारपेठेत गर्दी होत आहे.

ग्रामीण भागात पावसाळ्यासाठी सुकी मच्छी साठवणूक मोठ्या प्रमाणावर केली जाते. प्रजनन काळात ओल्या मच्छीला बंदी असते अशावेळी ओली मच्छी मिळत नसल्याने ग्रामीण भागातील मांसाहारी वर्ग सुक्या मच्छीला अधिक पसंती देतात. यामुळे सुकट, मांदेली, बारीक जवळा, अंबाडी, वाकटी माकली, ढोमकी, बोंबील, बांगडा यांची मागणी वाढली असून, ही सर्व सुकी मच्छी
खरेदी करण्यासाठी नागरिकांची बाजारपेठेत गर्दी होत आहे.


थोडे नवीन जरा जुने