पावसाळ्यात खवय्यांना सुक्या मच्छीचा आधारपावसाळ्यात खवय्यांना सुक्या मच्छीचा आधार
सध्या मांसाहारी खवय्यांना ताज्या मासळीच्या चढत्या भावामुळे ताजी मासळी परवडेनाशी झाली आहे. पावसाळा तोंडावर आल्याने आणि मच्छीमारी बंद होणार असल्याने परिणामी ओघ आता सुकी मासळी खरेदीकडे सुरू झाला आहे.या आधी जुनपर्यंत पनवेल कोळीवाड्यात मुंबई, अलिबाग आणि उरण येथून पापलेट, सुरमई, बाम, कोळंबी, बोईंट, खरबे, शिवडा, चिंबोरी, शिंगाली आदी माशांची भरपूर आवक असायची. खोल समुद्रातील होणारी मासेमारी बंदी या कारणांमुळे खवय्यांची भिस्त आता सुक्या मच्छीवर आहे. दरवर्षी मच्छीमारी पावसाळ्याच्या तोंडावर मे महिन्याच्या तिसन्या आठवड्यात मासेमारी बंद होते. त्या अनुषंगाने नागरिकांनी आता पासूनच सुखी मच्छी साठवून ठेवण्यास सुरुवात केली आहे. बाजारामध्ये सुकी मच्छी मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आली आहे. दर पाचसाळ्यात खवय्यांना सुकी मच्छीचाच आधार असतो. पावसाळ्यातील दीड महिने हा मासेमारी बंदीचा काळ असून या दिवसात मच्छीमार आपल्या बोटी समुद्रकिनारी शाकारून ठेवतात त्यामुळे मच्छीबाजारात पापलेट, हलवा, कोलंबी, सुरमई, मंदिली व मुशी हे मासे पहावयास मिळत नाहीत. त्यामुळे खाडीतील मच्छी व सुकी मच्छी यावर नागरिकांचा भर असतो. खाडीतील निवटे, खेकडे, तिसऱ्या तर सुकी मच्छीमध्ये सोडे, खारे, सुके बोंबील, करंदी यांचा समावेश असतो. सोडे हे ६०० रू. किलो दराने विकले जात आहेत. पूर्वी करंदीचा वाटा २० ते ३० रु. ला मिळत असे ती यंदा ५० रु. वर गेला आहे. खाडीतील खेकडे २०० ते २५० रू. डझन (लहान) तर मोठे खेकडे ४०० ते ५०० रु. दराने विकले जातात. खाडीतील मासे मात्र जवळच्या भागातील मच्छीबाजारात विकले जातात.


 मासेमारी बंदीचा काळ संपला की मोठ्या माशांची आवक सुरू होते. तोवर मात्र खवय्यांना खाडीतील मच्छी व सुक्या मच्छीवरच अवलंबून रहावे लागत आहे.थोडे नवीन जरा जुने