महाभागांवर पाणी तुंबण्याची शक्यता

महाभागांवर पाणी तुंबण्याची शक्यता

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार यंदा राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे महापालिका क्षेत्रातील संभाव्य पाणी तुंबण्याच्या ठिकाणांवर सफाईला वेग आला आहे. पण खारघर कोपरा पुलालगत उभारण्यात आलेल्या तात्पुरता पूल अजूनही तसाच ठेवण्यात आला आहे. या पावसाळ्यात खारघर डोंगर परिसरातील येणाऱ्या पाण्याचा निचरा होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे यंदाच्या पावसात सायन-पनवेल महामार्ग जलमय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.सिडको आणि महापालिका प्रशासनाने या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देऊन योग्य ती उपाय योजना करावी, अशी मागणी खारघरवासियांकडून केली जात आहे. खारघरमध्ये पार पडलेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार कार्यक्रमासाठी येणाऱ्या श्री सदस्यांना खारघरमध्ये बिना अडथळा प्रवेश आणि बाहेर पड़ता यावे, 


यासाठी कोपरा पुलाच्या शेजारी सिडकोकडून एक दिवसासाठी तात्पुरता उभारण्यात आला आहे. विशेष म्हणजे, एक सिमेंटचा पाईप टाकून हा पूल उभारण्यात आला आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्कार कार्यक्रम पार पडल्यावर माजी नगरसेविका लिना गरड यांनी नव्याने पूल उभारण्यात यावा, 


अशी मागणी पनवेल प्रशासनाकडे केली होती. दरम्यान, एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात पूल उभारणी केलेल्या ठेकेदाराने रात्री बाराच्या सुमारास पूल हटवण्याचा प्रयत्न केला होता. पण खारघर फोरमच्या सदस्यांनी त्याला पिटाळून लावत पूल तोडण्यास विरोध केल्यामुळे सिडको तसेच पालिकेची डोकेदुखी वाढणार आहे.


थोडे नवीन जरा जुने