अनुचित प्रकार घडू नये यासाठी चिर्ले गाव परिसरात तिसऱ्या डोळ्यांची नजर.







अनुचित प्रकार घडू नये यासाठी चिर्ले गाव परिसरात तिसऱ्या डोळ्यांची नजर.


सरपंचानी स्वखर्चात बसविले ६४ सीसीटीव्ही कॅमेरे.





उरण दि१०( विठ्ठल ममताबादे )चिर्ले ग्रुप ग्रामपंचायत हद्दीत घरफोडीचे सत्र वाढू लागल्याने रहिवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने व चिर्ले ग्रामपंचायत परिसरात यापुढे अनुचित प्रकार घडू नये यासाठी चिर्ले ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच तथा आर्यन एंटरप्राइजचे मालक सुधाकर उर्फ काका पाटील यांनी आपल्या ६४ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून चिर्ले, जांभूळपाडा,गावठाण परिसरात ६४ सीसीटीव्ही कॅमेरे स्वखर्चात बसविले आहेत.या सीसीटीव्ही कॅमेराचा लोकार्पण सोहळा बुधवारी ( दि१०) माजी सभापती नरेश घरत यांच्या उपस्थितीत चिर्ले येथील प्राथमिक शाळेच्या आवारात मोठ्या उत्साहात पार पडला.



  आर्यन एंटरप्राइजचे मालक तथा सरपंच सुधाकर उर्फ काका पाटील यानी चिर्ले परिसरातील विद्यार्थांसाठी स्वखर्चाने तिन मजली प्राथमिक शाळेच्या इमारतीची उभारणी केली आहे.तसेच गावातील अंतर्गत रस्ते, गटारे यांची कामे मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेतला असून स्वखर्चाने ग्रामपंचायत कार्यालयाची भव्यदिव्य इमारत उभारण्याचा शुभारंभ केला आहे.त्यात चिर्ले ग्रामपंचायत हद्दीत मोठ्या प्रमाणात घरफोडीचे सत्र सुरू असल्याने यावर नियंत्रण आणण्यासाठी व चोरट्यांना जेरबंद करून गावातील रहिवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून स्वखर्चाने ग्रामपंचायत परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा संकल्प गावकऱ्यांसमोर व्यक्त केला होता.



  चिर्ले ग्रामपंचायतीचे सरपंच सुधाकर उर्फ काका पाटील यांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा संकल्प हा बुधवारी ( दि१० में) ६४ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून चिर्ले ग्रामपंचायत परिसरात ६४ सीसीटीव्ही कॅमेरे गावकऱ्यांच्या उपस्थित बसवून पुर्ण केल्याने सरपंच सुधाकर उर्फ काका पाटील यांचे गावकऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.  

  यावेळी चिर्ले परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी मी जनतेचा सेवक म्हणून कटिबद्ध राहणार असा विश्वास सरपंच सुधाकर उर्फ काका पाटील यांनी उपस्थितांना दिला. यावेळी मिनाक्षी सुधाकर पाटील, आर्यन कंपनी चिर्ले चे समिर पाटील, भाग्यश्री समिर पाटील, माजी सभापती नरेश घरत,ग्रामविकास अधिकारी तथा लोकशाहीर वैभव घरत, हिराजी मढवी, सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर पाटील, दत्तात्रेय घरत,के.एन.मढवी,आकाश टकले,जे.सी.घरत, जयश्री घरत, माजी सरपंच मधुकर मढवी, माजी सरपंच अनंत ठाकूर,जी.सी.घरत, हरिश्चंद्र मढवी, सुभाष घरत, रंजना घरत, कुष्णा पाटील, रामनाथ मढवी,चैतन्य पाटील,चावला यांच्यासह इतर मान्यवरांनी सरपंच सुधाकर उर्फ काका पाटील यांचे अभिनंदन करुन वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.


थोडे नवीन जरा जुने